ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार हा दिवस शुक्र ग्रहाचा (Venus) मानला जातो. शुक्र हा सुख, समृद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक आहे. ज्यांच्या कुंडलीत शुक्र बलवान असतो, त्यांना जीवनात सर्व भौतिक सुखे प्राप्त होतात. याउलट शुक्र कमकुवत असल्यास आर्थिक चणचण आणि कौटुंबिक कलह निर्माण होतात.
Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
जर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा जीवनात सुखाची कमतरता भासत असेल, तर शुक्रवारी खालील उपाय केल्याने लाभ मिळू शकतो:
१. माता लक्ष्मीची विशेष पूजाशुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर पांढऱ्या रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत. माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि 'ॐ श्रीं श्रीये नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यामुळे पैशांशी संबंधित अडचणी दूर होतात.
२. पांढऱ्या वस्तूंचे दान (Donation)शुक्र ग्रहाचा रंग पांढरा आहे. त्यामुळे शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामध्ये साखर, तांदूळ, दूध, दही किंवा पांढरी वस्त्रे गरजू व्यक्तीला दान करावीत. यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो.
Chanakya Niti: लोकांमध्ये तुमची किंमत शून्य आहे? चाणक्य नीतीचे 'हे' ५ नियम वापरा, जग तुमचा आदर करेल!
३. 'श्री सूक्त' आणि 'कनकधारा स्तोत्र' पठणघरात आर्थिक बरकत राहावी यासाठी शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मी देवीसमोर श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. हे स्तोत्र लक्ष्मीला अत्यंत प्रिय असून, यामुळे व्यवसायात वृद्धी होते.
४. गाईची सेवाशुक्रवारी सकाळी पहिली भाकरी (पोळी) गाईला खाऊ घालावी. शक्य असल्यास त्या भाकरीवर थोडे गूळ आणि तूप ठेवावे. गाईमध्ये ३३ कोटी देवांचा वास असतो, त्यामुळे गाईची सेवा केल्याने सर्व अडथळे दूर होतात.
Astro Tips: घरातील स्त्रिया वारंवार आजारी पडतात? 'हा' सोपा उपाय; आरोग्याच्या तक्रारी करेल दूर!
५. घरात सुगंध दरवळू द्याशुक्राचा संबंध सौंदर्याशी आणि सुगंधाशी आहे. शुक्रवारी घरात उदबत्ती किंवा भीमसेनी कापूर जाळावा. स्वतः देखील अत्तर किंवा अत्तरयुक्त परफ्यूमचा वापर करावा. स्वच्छ आणि सुगंधी वातावरणात लक्ष्मीचा वास असतो.
६. मुंग्यांना साखर खाऊ घालणेजर कामात वारंवार अडथळे येत असतील, तर शुक्रवारी काळ्या मुंग्यांना पिठीसाखर किंवा पीठ खाऊ घालावे. हा उपाय ग्रहांची प्रतिकूलता कमी करण्यासाठी प्रभावी मानला जातो.
Web Summary : Friday, dedicated to Venus, brings prosperity. Strengthen Venus through Lakshmi worship, donating white items, reciting 'Shri Sukta,' serving cows, and maintaining a fragrant home. Feeding ants sugar also helps overcome obstacles.
Web Summary : शुक्रवार, शुक्र ग्रह को समर्पित, समृद्धि लाता है। लक्ष्मी की पूजा, सफेद वस्तुओं का दान, 'श्री सूक्त' का पाठ, गाय की सेवा और सुगंधित घर बनाए रखने से शुक्र मजबूत होता है। चींटियों को चीनी खिलाना भी बाधाओं को दूर करता है।