>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
विवाह करण्याची 'आस' कुणाला नसते? सगळ्यांना वाटते आपला विवाह व्हावा, आपला सखा सोबती जोडीदार मिळावा आणि त्याच्यासोबत जगण्याचा आस्वाद घेता यावा. थोडी लटकी भांडणे, कुरबुरी सर्व काही असावे आणि कुणीतरी आपला हात घट्ट धरून ठेवणारे असावे. मात्र ही आस सर्वांचीच पूर्ण होते असे नाही.
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
अनेकदा गुरु लग्न भावातून, सप्तम भावातून भ्रमण करताना विवाह होईल हे भाकीत फोल ठरते. ५० वेळा गुरु सप्तम लग्न भावातून जातो तरीही विवाह ही घटना घडत नाही, कारण मुळातच विवाहाला पोषक ग्रहमान पत्रिकेत नसते. अनेकदा दशा विवाह ही घटना देतेही, पण तेवढेच, शुक्र तसेच सप्तमेश, सप्तम भावावर दृष्टी टाकणारे पापग्रह आपली कामगिरी चोख बजावतात आणि मनाचा कारक चंद्र पुढे संसारात सुख निर्माण करण्यास असमर्थ असेल, तर शेवटी ओढून ताणून विवाह कशाच्या आधारावर टिकवायचा ? परिणीती अर्थातच....
अनेकदा अशी ग्रहस्थिती पाहिली आणि पालक किंवा जातक अनेकदा हतबल स्थितीमध्ये बोलत असतात, तेव्हा इतके वाईट वाटते की शुक्र आणि विवाहाची ग्रहस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल करावी. उचलून ते ते ग्रह अन्य ठिकाणी नेवून ठेवण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे असे वाटू लागते. पण तितके सोपे असते तर अजून काय हवे होते?
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
शेवटी आपले प्रारब्ध, भोग आपल्यालाच भोगायचे असतात, त्यापासून पळूनही जाता येत नाही हे खरे. विवाह झाला तरी टिकवण्याची सुद्धा ग्रहस्थिती, योग्य दशा असाव्या लागता. विवाह आनंद देणारा, दोन कुटुंबाना आणि त्या दोघांना मनाने बांधून ठेवणारा रंगीत धागा आहे. त्या धाग्याची गुंफण अधिकाधिक घट्ट होईल अशी ग्रहस्थिती आणि दशा पुढे आहेत की नाही हे पाहावेच लागते. चुकीच्या दशा धाग्याचे रंग फिक्कट तर करणार नाहीत, दोघांच्यात दुरावा निर्माण होणार नाही ना हे पहावे लागते. विवाह दोन मिनिटांचा असतो पण त्याचे परिणाम आयुष्यभराचे असतात म्हणून हे सर्व सोपस्कार करावे लागतात.
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
लोक आशेने फोन करतात तेव्हा त्यांच्या आवाजात ती 'आस' जाणवते. नाईलाज होतो. अशावेळी बोलून फोन ठेवते आणि महाराजांना सांगते, तुम्ही सूत्र हलवल्या शिवाय काहीही होणार नाही. सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. उच्चीचे सुख, समाधान, आरोग्य आणि उच्च कोटीची साधना आम्हा सर्वांच्याकडून करून घ्या. अपवित्र गोष्टींचा नाश करून मनाची ताकद, उमेद द्विगुणीत करा. शेवटी आपले हित ते अधिक जाणतात किबहुना त्यांच्याशिवाय कुणीच नाही जाणणार. ते जे काही करतील ते आपल्या भल्यासाठी हा विश्वास मनात ठवून हात जोडावे आणि त्यांनाच शरण जावे, कारण अध्यात्मात प्रचंड ताकद असते.
श्री स्वामी समर्थ!
संपर्क : asmitadixit50@gmail.com
Web Summary : Some horoscopes lack marriage prospects. Astrologer Asmita Dixit suggests spiritual remedies, trusting in a higher power for favorable outcomes. Strengthen faith for happiness.
Web Summary : कुछ कुंडलियों में विवाह की संभावना नहीं होती। ज्योतिषी अस्मिता दीक्षित अनुकूल परिणामों के लिए आध्यात्मिक उपचारों और उच्च शक्ति में विश्वास करने का सुझाव देती हैं। खुशी के लिए विश्वास को मजबूत करें।