घरातील लक्ष्मी मानल्या जाणाऱ्या स्त्रियांचे आरोग्य उत्तम असणे, हे संपूर्ण कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आवश्यक असते. जर तुमच्या घरात स्त्रिया वारंवार आजारी पडत असतील, तर ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी सुचवलेला एक अत्यंत प्राचीन आणि प्रभावी उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Ritual: सावधान! हातातील पूजेचा धागा 'इतक्या' दिवसांनंतर बनतो नकारात्मक ऊर्जेचं कारण!
घरातील गृहिणी किंवा महिला सदस्य आजारी पडल्या की अख्ख्या घराची घडी विस्कटते. अनेकदा औषधोपचार करूनही प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणे होत नाही. अशा वेळी वास्तू दोष किंवा पितृदोषाचा प्रभाव असू शकतो. ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी यावर एक अतिशय सोपा आणि सात्विक उपाय सांगितला आहे, जो थेट आपल्या स्वयंपाकघराशी जोडलेला आहे.
अग्नी देवतेचे महत्त्व आणि आरोग्य
भारतीय संस्कृतीत अग्नीला देव मानले जाते. स्वयंपाकघरातील शेगडी किंवा चूल हे अग्नीचे स्थान आहे. अन्नाद्वारेच आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. जर अन्नावर अग्नी देवतेची आणि अन्नपूर्णा मातेची कृपा असेल, तर ते अन्न ग्रहण करणाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहते.
ज्या घरांमध्ये महिलांचे आरोग्य नेहमी बिघडलेले असते, त्यांनी खालीलप्रमाणे रोजची सवय लावून घ्यावी:
१. चुलीचे/शेगडीचे पूजन: रोज सकाळी स्वयंपाक करण्यापूर्वी, शेगडी पेटवण्याआधी तिचे स्मरण करावे. हात जोडून अग्नी देवतेची प्रार्थना करावी. शक्य असल्यास शेगडीला हळद-कुंकू वाहून नमस्कार करावा. २. अग्नीला पहिला घास अर्पण करणे: आपण जो काही पहिला स्वयंपाक (उदा. पहिली चपाती किंवा भात) करू, त्याचा एक छोटासा भाग (घास) बाजूला काढून तो शेगडीजवळ किंवा अग्नी देवतेच्या नावाने अर्पण करावा. ३. स्मरण: "हे अग्नी देवा, या घरातील सर्वांचे आणि विशेषतः स्त्रियांचे आरोग्य उत्तम राख," अशी मनोभावे प्रार्थना करावी.
Numerology: तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात कोणत्या 'हेतूने' आला? याचे गुपित जन्मतारखेवरुन कळणार!
या उपायाचे फायदे
नकारात्मक ऊर्जेचा नाश: अग्नी देवतेच्या पूजनामुळे स्वयंपाकघरातील नकारात्मकता दूर होते.
अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद: अन्नाचा मान राखल्यामुळे घरात अन्नाची आणि आरोग्याची कमतरता भासत नाही.
मानसिक शांती: या छोट्याशा कृतीमुळे घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार होतात, ज्याचा थेट परिणाम घरातील स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर होतो. पाहा व्हिडिओ :
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1490132772101863/}}}}
Web Summary : For women's health, crucial for family well-being, astrology suggests honoring the kitchen fire. Pray to the fire before cooking, offer the first portion, and wish for good health.
Web Summary : परिवार की भलाई के लिए महिलाओं का स्वास्थ्य ज़रूरी है। ज्योतिष के अनुसार, रसोई की अग्नि का सम्मान करें। खाना बनाने से पहले अग्नि से प्रार्थना करें, पहला भाग अर्पित करें और अच्छे स्वास्थ्य की कामना करें।