शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Astro Tips: जुलै अखेरपर्यंत रागावर नियंत्रण ठेवा; मंगळ केतू युती नाती बिघडवेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:12 IST

Astro Tips: जुलै अखेरपर्यंत ग्रहस्थिती नकारात्मक परिणाम देणारी आहे, त्यामुळे रागावर संयम ठेवा, नाती जपा, माणसांना जोडून ठेवा, अन्यथा होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही! 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

एक जोडपे ४-५ दिवसांसाठी एका रिसोर्ट मध्ये राहायला गेले. एकमेकांच्या सोबत छानसे वेकेशन घालवणार म्हणून खूप मजेत होते. तिथे गेल्यावर त्या मुलाच्या लक्षात आले की आपल्याला दिलेली रूम सी फेसिंग नाही म्हणजेच आपल्या खोलीतून समुद्र दिसतच नाही. त्याला राग आला आणि तरातरा तो तेथील व्यवस्थापकाला म्हणाला, आमची खोली सीफेसिंग नाही. ह्यावर ते म्हणाले की इथे बुकिंग करताना तुम्ही जर आम्हाला सी फेसिंग रूम हवी आहे असे सांगितले असते तर आम्ही नक्कीच अशी रूम दिली असती, पण तुम्ही तसे काहीही सांगितले नव्हते. आताही देऊ शकणार नाही, कारण सर्व रूम बुक झाल्या आहेत. हे ऐकल्यावर त्याच्या रागाचा पारा अधिकच चढला आणि त्याने त्या हॉटेल त्या मालकाला बोलावले आणि त्यालाही हाच प्रश्न विचारला. त्यानेही तेच उत्तर दिले त्यावर तो मुलगा खूप जास्त चिडला आणि रूम मधे जाऊन त्याने घडलेला सर्व प्रसंग त्याच्या पत्नीला सांगितला.

पत्नी समजूतदार होती . तिने त्याला सांगितले सगळ्यात महत्वाचे काय आहे? तर आपण एकमेकांच्या सोबत एकत्र वेळ घालवणे . आपल्या खोलीतून समुद्र दिसणे हे महत्वाचे अजिबात नाही. आपल्याला वाटले तर रोज आपण समुद्रावर एक मस्त फेरी मारून येत जाऊ. त्यावर मुलगा अधिकच भडकला. झाले! त्या दोघांच्यात तू तू मैमै सुरु झाली आणि पुढील ५-६ दिवस ना ते एकत्र जेवले, ना ते एकत्र फिरले. त्यांच्यातील संवाद जणू संपला आणि ज्या मेमरीज मिळवण्यासाठी ते आले होते, जे आनंदाचे क्षण ते जगायला आले होते, ते न उपभोगतात ते निघून गेले. वेकेशन संपली पण त्यातून आनंद मिळाला नाही उलट डोक्याला ताप झाला. खरेतर चूक त्या मुलाचीच होती . समुद्र रूम मधून दिसावा अशी सूचना करून त्याने बुकिंग केले असते तर पुढील सर्वच टळले असते. 

नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!

कुठली गोष्ट किती ताणून धरायची हे महत्वाचे असते. राग राग राग, कसला राग इतका? आणि दुसऱ्याला वाट्टेल तसे बोलण्याचा अधिकार दिला कुणी तुम्हाला? स्वतःचाही आनंद घालवायचा आणि इतरांचाही . घरातील एकवेळ ऐकून घेतील पण बाहेरचे कुणी का ऐकून घ्यायचे ? 

सांगायचे तात्पर्य असे की आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. आयुष्यात आपण सगळ्यांना आवडत नाही आणि सगळे आपल्यालाही आवडत नाहीत, पण तरीही अशा लोकांसोबत उठबस करावी लागते तेव्हा चार हात दूर राहणे पसंत केले तर सोपे होते. अनेकदा घरात , कामाच्या ठिकाणी अनेक व्याप असतात , असंख्य गोष्टीनी आपले आयुष्य आज घेरलेले आहे त्यात आर्थिक चिंता आणि आयुष्यात निर्माण झालेली अनिश्चीतता , संघर्ष करायला लावते. या सर्वातून आपले आयुष्य जात असताना राग येणार. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपली स्वतःची तब्येत तर बिघडवण्यास आणि कुटुंबातील आनंदाला सुरुंग लावण्यास कारणीभूत ठरतो. 

समाजजीवन जगताना ज्यांना क्रोध येतो किंवा ज्यांना समोरच्या शाब्दिक चकमकी करून दुसर्याला दुखावून सगळेच वातावरण गढूळ करण्याची सवय आहे त्यांनी समाजातील कुठल्याही कामात पडू नये . कारण त्यामुळे माणसे दुखावतात आणि ती कायमचीच...

आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!

सर्वात महत्वाचे आपण आणि आपले कुटुंब! त्यामुळे आपले आरोग्य जपा, आपल्या माणसाना आपण हवे आहोत. माणसाना दुखावून आपल्याला मिळणार तरी काय ? माणसं जपणे ही एक कला आहे आणि ती आज प्रत्येकाने आवडो अथवा न आवडो शिकलीच पाहिजे तरच आपले आणि इतरांचेही आयुष्य सुसह्य होईल. माणसं जपणे म्हणजे माणसातील परमेश वर जपणे . असतात तेव्हा माणसांचे महत्व नसते पण नसली की आपण केलेल्या चुका आठवतात आणि पश्चात्ताप करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. जुलै अखेरपर्यंत मंगळ केतू युती आहे . १३ जुलै ला शनी महाराज सुद्धा वक्री होणार आहेत आणि ते ह्या दोन ग्रहांच्या षडाष्टकात असणार आहेत तेव्हा आयुष्याचे , मैत्रीचे , हितसंबंध ह्यातील सूर बेसुरे होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आहे सर्वानीच!

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिषrelationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप