शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:30 IST

Pandharpur Ashadhi Wari Information Marathi: प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हणतात, या वारीत जाण्याने नेमकं मिळतं तरी काय? चला जाणून घेऊ!

>> सर्वेश फडणवीस

६ जुलै रोजी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2025) आहे आणि त्यानिमित्ताने पंढरीरायच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरला वारीसाठी(Ashadhi Wari 2025) निघाला आहे. त्यात ज्ञानोबा, तुकाराम, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई या संतांची मांदियाळीही पालखी रूपात सहभागी होते तेव्हा आनंद दुणावतो. या सोहळ्याचा शब्दानुभव घेऊया. 

वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. गेली साडेसातशेहून जास्त वर्षे ' वारी ' अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांसाठी दिंडी, भजन, कीर्तन, रिंगण, खेळ याचसोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आळंदीहून प्रस्थान ठेवलेली श्रीसंत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करण्याऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे. आपणही सगळे या पालखी सोहळ्यात सामाविष्ट होतो आहे. आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माउलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्णाहरीचा गजर करत आपल्या जागेवरून व्हाया आळंदी ते पंढरपूरला जायचे आहे. कारण या परंपरचे, महाराष्ट्र साडेसातशेहुन अधिक वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावनेने आचरण करत आहे. लाखो वारकरी, हजारो मृदुंग, हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेने चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदाने कोंदून जाते. मैलोगणिक तो नामध्वनी, पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन, पाऊस, वारा, वादळ, तहान, भुकेची पर्वा न करता मार्गक्रमण करीत असतात.

कायम वाटतं वारी म्हणजे मानवा-मानवांमध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे, समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी आणि या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी आहे.

वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं, वारी म्हणजे देव-भक्त भेटीतील आतुरता, वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास, वारी म्हणजे जीवशिवाच्या मिलनाची प्रक्रिया, वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास, वारी म्हणजे देव शोधता-शोधता स्वत:च देव होऊन जाणं, वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रति जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे. "वारी" हा भगवद्भक्तीचा नुसता आविष्कार नसून, भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला डोळ्यांनी पाहत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी आहे.

याच वारीत वारकरी भजन, कीर्तन, ओव्या,अभंग म्हणत पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवतात आपणही या माध्यमातून एक तरी ओवी अनुभवत या वारीत सामील होण्याचा प्रयत्न करूया. संत साहित्यात हजारो ओव्या आणि अभंग समाविष्ट आहेत. अशाच काही ओव्यांचा वारीच्या निमित्ताने रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात,

कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरीनाथ बोलावितो ॥ १ ॥ मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥ २ ॥ निलाजिरें चित्त करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळे || ३ || तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया ॥ ४ ॥

अर्थात पंढरीनाथ तुला बोलावितो आहे, तू चल', अशी शुभवार्ता मी कोणाच्या तोंडाने ऐकेन ?॥ १ ॥ मग मी संसाराची आशा, अपकीर्तीची भीती न बाळगता सत्वर गतीने पंढरी माहेराची वाट धरीन ॥ २ ॥ माझे चित्त लोक लाजेची पर्वा न करता पंढरीहून पंढरीनाथाचे बोलावणे कधी येईल या आशेने वाटेकडे दृष्टी लावून तळमळत राहिले आहे ॥ ३ ॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, माझे पंढरी पाहाण्याचे सौभाग्य कधी उजळणार काही कळत नाही ॥ ४ ॥ हीच त्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सकलसंतांच्या मनातली भावना आहे.

'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय'

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Indian Festivalsभारतीय उत्सव-सणspiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी