शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi 2023: यंदा पायी वारीला जायचा विचार करताय? जाणून घ्या वारीचे तारीखवार वेळापत्रक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 14:17 IST

Ashadhi Ekadashi 2023: वारीला जायचे तर आहे, पण कधी, कसे आणि कुठे हे अनेकांना माहीत नसते, त्यांच्यासाठी ही सविस्तर माहिती. 

आयुष्यात एकदा तरी पायी वारी करावी असं म्हणतात. कारण वारीचा अनुभव आपल्याला समृद्ध करणारा असतो. तिथे येणारे भाविक शिस्तबद्धपणे पांडुरंग हरी, वासुदेव हरी हा जयघोष करत प्रतिकूल परिस्थितीतुन मार्ग काढत वारी पूर्ण करतात. वारी केल्यामुळे आपला अहंकार गळून पडतो. माणसांची पारख होते. परिस्थितीशी जुळवून घेण्याचं अप्रत्यक्ष ट्रेनिंग मिळतं. मात्र हा अनुभव घेत असताना बाह्य चक्षूंनी बघाल तर उणिवा दिसतील, मन:चक्षूंनी अनुभव घ्याल तर समृद्ध व्हाल. वारीत हौसे, नवसे, गवसे असे सगळ्या प्रकारचे लोक येतात. जे खरे भाविक असतात, ते शिस्तबद्धपणे मार्गक्रमणा करतात. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतात. याउलट निव्वळ वारी कशी असते म्हणून बघायला आलेले लोक वारीच्या पथाची दुर्दशा करतात. त्यामुळे वारीला गालबोट लागते. म्हणून तुम्ही जर वारीत सहभागी होणार असाल तर सच्चा भाविकासारखे सहभागी व्हा. आनंद द्या , आनंद घ्या आणि विठ्ठलमय होऊन जा. त्यासाठी वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे- 

सदर वेळापत्रक श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांनी दिले आहे. त्यानुसार पालखी सोहळा पुढीलप्रमाणे-

११ जून : आळंदी येथून प्रस्थान १२ जून : भवानी पेठ, पुणे १३ जून : पुणे १४ जून : सासवड १५ जून : सासवड १६ जून : जेजुरी १७ जून : वाल्हे १८ जून : लोणंद १९ जून : लोणंद २० जून : तरडगाव २१ जून : विमानतळ फलटण २२ जून : बरड २३ जून : नातेपुते २४ जून : माळशिरस २५ जून : वेळापूर २६ जून : भंडीशेगाव २७ जून : वाखरी २८ जून : पंढरपूर २९ जून : आषाढी एकादशी 

उभे रिंगण 

२० जून : चांदोबाचा लिंब २७ जून : बाजीरावची विहीर २८ जून : पंढरपूर 

गोल रिंगण : 

२४ जून : पुरंदवडे २५ जून : खुडूस फाटा २६ जून : ठाकूरबुवाची समाधी २७ जून : बाजीरावची विहीर 

अधिक माहितीसाठी संपर्क : ८५३०६१७२७२

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र