शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

Ashadhi Ekadashi 2022 : आषाढी एकादशी सगळ्या एकादशींची महाराणी का म्हटली जाते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 07:00 IST

Ashadhi Ekadashi 2022 : १० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया या दिवसाचे विशेष महत्त्व! 

दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात, त्यांना वेगवेगळी नावे आहेत. आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले आहे. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात हाीते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते. लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात. विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते. या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता, महाएकादशी हे नाव सार्थक ठरते. यंदा १० जुलै २२ रोजी आषाढी एकादशी आहे. 

भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शिरोधार्थ मानतो. ज्ञानोबा-तुकाराम या संतांनी धर्माचे लोण महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म प्राणाहून प्रिय मानतो. या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे. म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात. आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे. परंतु उपासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणे अयोग्य आहे. 

एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे, असे शास्त्र सांगते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला हरकत नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे, म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात. पुढील चार महिने वेगवेगळी पूजा, व्रत, पूजा, सण, उत्सव तसेच जपतपादि कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषवण्याचा प्रयत्न करतात.

आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यत: विठ्ठलाची पूजा करतात. पांडुरंगाच्या ठायी विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करतात. भजन, पूजन, कीर्तन, हरीकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहानथोर सहभागी होतात. या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठलभक्तीचा तर नुसता सुकाळ असतो. विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जिवाचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते. चंद्रभागेत स्नान करून मंडळी घरी परततात.

आषाढी एकादशीस चातुर्मासारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात. अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही व दह्याचे पदार्थ, अश्विन महिन्यात दूध व दुधाचे पदार्थ आणि कार्तिकात द्विदल धान्य म्हणजे कडधान्य व्यर्ज्य करतात. काही जण चार महिने एकभुक्त राहतात, तर काही जण सुखशय्या व्यर्ज्य करतात. काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात. नित्य देवदर्शन, कथा कीर्तन, श्रवण, पूजा, अभिषेक, नदीस्नान असे अनेक नेमधर्म आचारण्याची परंपरा आजही सर्वत्र सुरू आहे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी