शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:21 IST

Ashadha Month Importance: २६ जून रोजी आषाढ सुरू होत आहे, आता चार महीने आनंदाचे डोही आनंद तरंग; काय आहे या महिन्याचे वैशिष्ट्य? जाणून घ्या!

Ashadha Month Festivals: यंदा २६ जून पासून आषाढ मास सुरु आहे. आपल्या संवत्सर चक्रातील चौथा महिना आषाढ होय. जेव्हा पूर्वाषाढा अथवा उत्तराषाढा नक्षत्र पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर असते, त्या मासाला आषाढ असे नाव आहे. याच आषाढाचे दुसरे नाव 'शुचि' असे आहे. या मासाचे विस्तृत वर्णन ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी धर्मबोध ग्रंथात केले आहे. 

नेमका या काळातच पाऊस होतो, म्हणून कवीदेखील `ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना' असे आर्जव करू लागतात. तसेच `गडद निळे गडद निळे जलद भरून आले' अशी त्याच्या आगमनाची आनंदवार्ता साऱ्यांना सांगू लागतात.  महाकवी कालिदासालाही या मेघदूतांनी मंत्रमुग्ध केले. 'आषाढस्य प्रथम दिवसे' अशा शब्दात आपल्या `मेघदूत' या अजरामर रचनेचा प्रारंभ करून कविराजांनी आषाढाबद्दलची आपली आत्मीयता व्यक्त केली आहे. कालिदासाच्या जन्माची तिथी निश्चितपणे नमूद नसल्याने आषाढाच्या पहिल्या दिवसाला 'महाकवी कालिदास दिन' म्हणून संबोधले गेले. 

हा महिना अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. पांडुरंगाच्या भक्तीचा महापूर या मासातील शुद्ध एकादशीस म्हणजे आषाढी एकादशीस(Ashadhi Ekadashi 2025) येतो. त्यानंतर चारच दिवसांनी येणारी गुरुपौर्णिमा(Guru Purnima 2025) ही `ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था' असा जयजयकार करणारी आहे. 

या महिन्यात सूर्याचे कर्कसंक्रमण होते, तिथूनच दक्षिणायन सुरू होते. हिंदूंच्या दृष्टीने महत्त्वाचा असा चातुर्मास आषाढ शुद्ध एकादशीपासून(Ashadhi Ekadashi 2025) सुरू होतो. काही मंडळी आषाढ पौर्णिमेपासून चातुर्मास(Chaturmas 2025) प्रारंभ मानतात. आषाढ शुद्ध एकादशीपासून पुढे चार महिने देव झोपी जातात, अशी श्रद्धा आहे. देवांच्या या शयनकाळात असूर प्रकट होऊन मानवाला त्रास देऊउ लागतात. असुरांच्या या त्रासापासून स्वत:चे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने त्याला शक्य होईल असे कोणते ना कोणते व्रत करावे. म्हणून चातुर्मासात विपुल व्रत-वैकल्ये आचरली जातात. काही मंडळी रोज एक वेळ भोजन करतात, तर काही जण एक दिवस उपवास आणि दुसऱ्या दिवशी भोजन असे `धारणा-पारणा' नावाचे व्रत करतात. काहीजण चार महिने केवळ एक अथवा दोनच धान्यांचा आहारात समावेश करतात. 

या चातुर्मासात एक चातुर्मास्य व्रत आहे. त्यात श्रावण मासामध्ये भाजीपाला, भाद्रपद मासात दही, अश्विन मासात दूध तर कार्तिक मासात द्विदल धान्य पूर्णत: व्यर्ज्य करावयाची असतात. या व्रताची सुरुवात आषाढ शुद्ध द्वादशीला विष्णूपूजा करून केली जाते. या पूजेत जाईच्या फुलांना विशेष महत्त्व असते. तर कार्तिक पौर्णिमेला या व्रताचे उद्यापन करतात. त्यानंतरच सर्व सेव्य पदार्थांचा आहारात पुन्हा वापर केला जातो.

Ashad Special Food: आषाढ तळला का? आषाढात पदार्थ तळण्याची प्रथा काय असते, पाहा आषाढ स्पेशल पुऱ्यांची रेसिपी

आषाढाचा पहिला पंधरवडा असा पवित्रपूर्ण असला, तरी ही सगळी पतिव्रता अमावस्येच्या दिवशी कुठे जाते कुणास ठाऊक? कारण, गटारी अमावस्या सर्वसामान्य माणसाला एकापरीने अध:पतित करते असेच म्हटले पाहिजे. दारु पिणाऱ्या लोकांना काहीतरी कारण हवे असते. लोकांना गटारी अमावस्या हे दारु पिण्यासाठी भक्कम निमित्त वाटते. मुळात ह्या अमावस्येला हे विकृत स्वरूप मिळाले, हे दुसऱ्या दिवसानंतर म्हणजे आषाढ अमावस्येनंतर येणाऱ्या श्रावणात पूर्ण मासभर उपवास असल्यामुळे दारु पिता येणार नाही, अशी लोकांनी सोय (?) करून ठेवली. स्वत:च्या मनातील इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धर्मातील काही मार्गांचा कसा कौशल्याने दुरुपयोग केला जातो, त्याचे गटारी अमावस्या हे लाजिरवाणे, क्लेशकारक उदाहरण आहे. परंतु, संस्कृतीने आषाढ अमावस्येला(Ashadh Amavasya 2025) दिलेले रूप किती सुंदर आहे, ते आगामी लेखात जाणून घेऊच. तुर्तास आषाढाचे हर्षोल्हासाने स्वागत करू...!

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Guru Purnimaगुरु पौर्णिमाPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक