Ashadha Amavasya 2021:वाचा दिव्याच्या अवसेची कथा आणि मिळवा उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अपार धनसंपदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 12:19 PM2021-08-06T12:19:28+5:302021-08-06T12:20:24+5:30

Ashadha Amavasya 2021: घरातील अलक्ष्मी जाऊन लक्ष्मी घरात नांदत राहो, हे या कथेचे सार आहे.

Ashadha Amavasya 2021: Read the story of Deep Amavasya and get better health, longevity and immense wealth! | Ashadha Amavasya 2021:वाचा दिव्याच्या अवसेची कथा आणि मिळवा उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अपार धनसंपदा!

Ashadha Amavasya 2021:वाचा दिव्याच्या अवसेची कथा आणि मिळवा उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अपार धनसंपदा!

googlenewsNext

आपल्या महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला 'दिव्याची अवस' म्हणतात. रविवारी ९ ऑगस्ट रोजी दिव्यांची अवस आहे. या दिवशी घरातील स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासूनपुसून लख्ख करतात. नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्यांच्याभोवती रांगोळी काढात. रात्री ते सर्व दिवे तेल वाती घालून प्रज्वलित करतात. त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. 'सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या, तू स्वत: तेज आहेस, प्रकाश आहेस. तू आमच्या पूजेचा स्वीकार कर, आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर' अशी त्याची प्रार्थना करतात. त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याची कहाणी सांगितली जाते तिचे भक्तीपूर्वक श्रवण करतात. दिव्याच्या अवसेची कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे. 

Ashadha Amavasya 2021 : आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना का ओवाळतात? जाणून घ्या!

ती कथा पुढीलप्रमाणे - 

तामीळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची दोन मुले होती. त्या दोघांनी स्वत:च्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले. 

पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या. त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव 'सगुणा' होते. विनीतला तीन मुलगे झाले. पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोगत होती. परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्रय आले. त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले. धाकट्या सगुणाला आईचे वागणे आवडले नाही. तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले. गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आईवडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले.

पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला. स्नानाच्यावेळी त्याने आपली बहुमुल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती. ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळवली. मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली. ती सगुणेला मिळाली. सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले. तिने प्रामाणिकपने ती राजाला नेऊन दिली. राजाने खूष होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले. शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले.

तेव्हा तिने `येत्या शुक्रवारी अमावस्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील. बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत' अशी इच्छा प्रदर्शित केली. राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले. इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले. नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले. तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराला सांगून ठेवले, क जी जी सवाष्णबाई घरातघरात प्रवेश करू बघेल, तिच्याकडून `मी पुन्हा कधीही या घरी येणार नाही' असे वचन घ्या. मगच तिला बाहेर जाऊ द्या. 

तिन्ही सांजेच्यावेळी माता लक्ष्मीदेवी त्या राज्यात आली. तिला सर्वत्र अंधार दिसला. मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते. तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले. लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारीद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली. तिथे उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेतले मगच बाहेर जाऊ दिले. त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले. राज्यातील ससर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले.

अशी ही दिव्याच्या अवसेची कथा तुम्हालाही फळो, ही शुभेच्छा!

Ashadha Amavasya 2021 : आषाढ अमावस्येला 'दिव्याची आवस' म्हणतात, गटारी नव्हे!

Web Title: Ashadha Amavasya 2021: Read the story of Deep Amavasya and get better health, longevity and immense wealth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.