ब्रह्मांडात प्रत्येक गोष्ट ऊर्जेने बनलेली आहे आणि प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट फ्रीक्वेंसीवर (Frequency) स्पंदित होत असते. जेव्हा एखादी व्यक्ती 'हाय व्हायब्रेशन'मध्ये असते, तेव्हा ती केवळ स्वतः आनंदी राहत नाही, तर इतरांनाही प्रेरणा देते.
'हाय व्हायब्रेशन' (High Vibration) व्यक्ती म्हणजे अशा व्यक्ती ज्यांच्या सभोवताली एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते. तर काही व्यक्तींच्या सहवासात गेल्यावर उच्च स्पंदनं किंवा हाय व्हायब्रेशन जाणवतात. अशा व्यक्तींची वैशिष्ट्य कशी ओळखावी, हे सांगणारा लेख.
१. कृतज्ञतेची भावना (Living in Gratitude)हाय व्हायब्रेशन असलेल्या व्यक्ती नेहमी तक्रार करण्याऐवजी त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असतात. लहान-लहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची कला त्यांना अवगत असते.
२. तीव्र अंतर्ज्ञान (Strong Intuition)अशा व्यक्तींचे 'गट फीलिंग' किंवा अंतर्ज्ञान खूप प्रबळ असते. त्यांना परिस्थितीचा किंवा लोकांच्या हेतूंचा अंदाज इतरांपेक्षा लवकर येतो आणि त्या स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकतात.
३. भावनिक संतुलन (Emotional Intelligence)आयुष्यात चढ-उतार प्रत्येकाच्याच येतात, पण हाय व्हायब्रेशन व्यक्ती नकारात्मक भावनांमध्ये अडकून पडत नाहीत. त्या रागावर किंवा दुःखावर प्रक्रिया करून पुन्हा सकारात्मकतेकडे वळतात.
४. निसर्गाशी जवळीक (Deep Connection with Nature)निसर्ग, प्राणी आणि झाडांमधून ऊर्जा मिळवणे त्यांना आवडते. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर त्यांना अधिक शांत आणि रिचार्ज झाल्यासारखे वाटते.
५. इतरांना मदत करण्याची वृत्ती (Empathy & Kindess)अशा व्यक्ती निस्वार्थीपणे इतरांना मदत करतात. त्यांच्या उपस्थितीमुळे लोकांना सुरक्षित आणि उत्साही वाटते. त्या कोणाबद्दलही मत्सर किंवा द्वेष बाळगत नाहीत.
६. आरोग्याची आणि ऊर्जेची काळजीहाय व्हायब्रेशन व्यक्तींना त्यांच्या शरीराची किंमत माहीत असते. चांगला आहार, पुरेशी झोप आणि ध्यान (Meditation) यांद्वारे त्या आपली ऊर्जा टिकवून ठेवतात.
७. वर्तमानात जगणे (Living in the Now)भूतकाळातील वाईट आठवणी किंवा भविष्यातील चिंता यांत वेळ घालवण्यापेक्षा, त्या वर्तमानातील क्षणाचा आनंद घेण्यावर भर देतात.
८. अर्थपूर्ण नातेसंबंधांची ओढअशा व्यक्तींना केवळ नावापुरती नाती किंवा गर्दी आवडत नाही. त्यांना खोल, अर्थपूर्ण आणि प्रामाणिक संवादाची आवड असते. त्या 'ड्रामा' किंवा गॉसिपिंगपासून दूर राहणे पसंत करतात.
९. सर्जनशीलता आणि प्रेरणा (Creativity & Inspiration)नव्या कल्पना सुचणे, सतत काहीतरी नवीन तयार करण्याची इच्छा असणे हे उच्च स्पंदनांचे लक्षण आहे. त्यांच्या संपर्कात येणारे लोकही स्वतःला प्रेरित समजतात.
१०. वैश्विक ऊर्जेवर विश्वास (Trust in the Universe)अडचणीच्या काळातही "जे होतंय ते चांगल्यासाठीच" हा विश्वास त्यांच्याकडे असतो. विश्वाच्या योजनेवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो.
अशा व्यक्तींपैकी तुम्ही एक आहात का? किंवा तुमच्या अवती भोवती अशी कोणी व्यक्ती आहे का, हे ताडून पाहा.
Web Summary : Discover if you're a high-vibration person radiating positivity or an energy drainer. Traits include gratitude, intuition, emotional balance, nature connection, kindness, self-care, presence, meaningful relationships, creativity, and faith.
Web Summary : जानें कि क्या आप सकारात्मकता फैलाने वाले 'हाई वाइब्रेशन' व्यक्ति हैं या ऊर्जा चूसने वाले। लक्षणों में कृतज्ञता, अंतर्ज्ञान, भावनात्मक संतुलन, प्रकृति से जुड़ाव, दयालुता, आत्म-देखभाल, वर्तमान में जीना, सार्थक रिश्ते, रचनात्मकता और विश्वास शामिल हैं।