शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:24 IST

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. यासह काही उपाय करणे उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न पावणारी. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यंदा १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी अन्नपूर्णा जयंती, नर-नारायण जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते, असे सांगितले जाते.  जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णूंचे विशेष पूजन केले जाते. त्यावेळी काही उपाय केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशीर्वाद, सुख-समृद्धी, यश-प्रगती, पद-पैसा-प्रतिष्ठा यांची प्राप्ती होऊ शकते. वैभव-भरभराट मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य' म्हणजेच न संपणारे असे मिळते, असा समज आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात. अक्षय्य तृतीयेला श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करावी. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून श्रीविष्णूंची षोडषोपचार पूजा करावी. देवी लक्ष्मीला पांढरी व गुलाबी फुले अर्पण करावी. शक्य असेल तर कमळाचे फूल अर्पण करावे. श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवीच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. तसेच आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. नामस्मरण करावे. मनापासून प्रार्थना करावी.

अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग

पुराणांमध्ये अक्षय्य तृतीया अतिशय शुभ तिथी असल्याचे सांगितले गेले आहे. सन २०२४ च्या अक्षय्य तृतीयेला रवियोग, धन योग, शुक्रादित्य योग, गजकेसरी योग, षष्ठ योग आणि मालव्य राजयोग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व खूप वाढले आहे. अक्षय्य तृतीयेला तयार होत असलेल्या शुभ योगाचे महत्त्व सांगताना लक्ष्मी प्राप्तीसाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. याने अनेकविध फायदा मिळू शकतात, असे म्हटले जात आहे.

अक्षय्य तृतीयेला दान अवश्य करा

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने दान व तर्पण अर्पण करणे. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करता आले तर त्याचे विशेष महत्त्व असून पितरांच्या नावाने दान केल्यास शाश्वत फळ मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो, असे म्हणतात. या दिवशी केलेले दान अक्षय्य होते, असे भविष्यपुराणात आलेले आहे. या दिवशी पाण्याचे मडके, पंखे, छत्री, जवस, गहू, तांदूळ, वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी मानतात. परंतु दान हे सत्पात्री असावे, असे सांगितले जाते.

धनवृद्धीसाठी काय उपाय करावा?

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ११ कवड्यांची माळ करून लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवावी. या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. ११ कवड्यांची माळ देवीला अर्पण करावी. त्यानंतर कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवावी. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते आणि धनात चांगली वाढ होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. यासाठी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

लक्ष्मी देवीला दाखवा आवडता नैवेद्य

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी घरातील प्रवेशद्वाराच्या चौकटीवर हळदयुक्त पाणी शिंपडावे. केशर आणि हळद लक्ष्मी पूजनात अर्पण करावे. लक्ष्मी देवीला आवडत्या पदार्थांचा नैवेद्य अवश्य दाखवावा. तसेच खीर अर्पण करावी. असे केल्याने आर्थिक समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने नोकरी आणि व्यवसायात वाढ होऊ शकते, असे सांगितले जाते. यासाठी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

अक्षय्य तृतीयेला हाही उपाय करून पाहावा

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी लाल कापडात नारळ बांधून ठेवा, नंतर विधिवत पूजा करा. पूजा केल्यानंतर नारळ कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने संपत्तीत चांगली वाढ होऊ शकेल. अडकलेला पैसा परत मिळू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीविष्णूंचे सहस्त्रनाम आणि श्रीसूक्ताचे पठण अवश्य करावे. ही दोन्ही स्तोत्रे म्हणणे शक्य नसेल, तर मग श्रवण करावे. लक्ष्मी देवी तसेच श्रीविष्णूंच्या मंत्रांचा जप करावा. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण अवश्य करावे. तसेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीरामचरितमानसच्या अरण्य कांडाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पठण शक्य नसेल तर श्रवण करावे. यामुळे केल्याने प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक