शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:43 IST

Aja Ekadashi 2025 Vrat Puja: यंदा १९ ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे, हे व्रत केल्यास अनेक लाभ होतात असा भाविकांचा अनुभव आहे, ते लाभ कोणते व कसे मिळवावे ते जाणून घ्या.

या वर्षीचा श्रावण मास अखेरच्या टप्प्यावर आला आहे. श्रावणातला शेवटचा आठवडा आणि अजा एकादशीचे व्रत. यंदा १९ ऑगस्ट रोजी अजा एकादशी (Aja Ekadashi 2025) आहे. या व्रताचे वैशिष्ट्य असे की हे व्रत केले असता आपले गतवैभव प्राप्त होते. ही श्रद्धा रूढ होण्यामागे आहे एक पौराणिक कथा, त्यासोबतच जाणून घ्या त्या व्रताचे लाभ आणि व्रत विधी. 

Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!

अजा एकादशीची व्रत कथा:

या एकादशीशी राजा हरिश्चंद्राची कथा निगडित आहे. सत्यवचनी  हरिश्चंद्र राजाला दुर्दैवाने राजत्याग करून विजनवास पत्करावा लागला. एवढेच नव्हे तर दिलेल्या शब्दाला जागून विश्वामित्र ऋषींची दक्षिणा देण्यासाठी स्वत:च्या पत्नीला म्हणजे राणी तारामतीला आणि मुलाला देखील विकावे लागले. एका ऋषींनी हरिश्चंद्राला हे अजा एकादशीचे व्रत करावयास सांगितले. त्याप्रमाणे हरिश्चंद्राने मनोभावे हे व्रत केले. त्यामुळे त्याला त्याचे गेलेले राज्य, पत्नी आणि पुत्र या साऱ्यांची पुर्नप्राप्ती झाली, अशी कथा आहे. या व्रताने मोक्षप्राप्ती होते अशी या कथेची फलश्रुती आहे.

व्रतविधी :

हे व्रत इतर एकादशीच्या व्रतासारखेच आहे. सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवपूजा करावी. 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा मंत्र १०८ वेळा म्हणावा. दोन्ही वेळेस उपास करावा. भूक लागल्यास फलाहार करावा, परंतु उपासाचे पदार्थ टाळावेत. देवाची मनोभावे पूजा करावी व आपल्या कार्यातील अडचणी देवाला सांगून त्यातून मार्ग दाखवावा अशी विनंती करावी. 

श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार

या व्रताची सद्यस्थितीशी सांगड घालताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात- प्रियजनवियोग, अपघात, इतर संकटे, आजार, निसर्गाचा प्रकोप, व्यवसायातील आर्थिक चढ उतार, सुख दु:ख असे अनेक कटू अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी थोड्याफार प्रमाणात येत असतात. त्यावेळी येणाऱ्या नैराश्याचे मळभ दूर करण्यासाठी, मनाला उभारी येण्यासाठी राजा हरिश्चंद्राच्या वाट्याला आलेली पराकोटीची अवहेला, त्यातूनही पुढे त्याला मिळालेले गतवैभव या गोष्टी पुरेशा प्रेरणादायी असतात.

व्रताचे लाभ:

अजा एकादशीसारखे उपवास, व्रत केल्याने आशेचा किरण नैराश्याच्या काळोखापासून माणसाला सतत वाचवीत असतो. त्यामुळे मनोधैर्य मिळावे म्हणून ही एकादशी करावीशी वाटली तर जरूर करावी. शक्य असेल तर हे निमित्त साधून एखाद्याला व्यवसायात खोट आली असेल, कर्ज झाले असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करावे, धीर द्यावा. शक्य असल्यास त्याला कमीपणा वाटणार नाही अशा तऱ्हेने मदतीचा हात पुढे करावा. तुमच्या ओळखीने त्याचा धंद्याचा पेच सुटणार असेल तर तशीही मदत करावी. एखाद्याच्या मालाला उठाव नसेल अथवा त्याने नवीनच व्यवसाय सुरू केला असेल तर त्या मालाची, वस्तूची आवर्जून खरेदी करावी. चारचौघांनाही त्याची खरेदी करावयास उद्युक्त करावे. मराठी माणसे वगळता इतर सर्व भाषिकांमध्ये असे सहकार्य केले जाते. आपण हा गुण अंगी बाणवून घेतला तर समाजपुरुषाला बरे वाटेल. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलekadashiएकादशीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण