शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Adhik Maas 2023: अधिक मासात एकवेळ जेवणाचा नियम पाळला जातो, पण का? जाणून घ्या त्यामुळे होणारे लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 12:31 IST

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक मास सुरू होत आहे, त्यानिमित्ताने अनेक जण अनेक प्रकारचे संकल्प करतात, त्यापैकीच एक म्हणजे एकभुक्त व्रताचा संकल्प!

यंदा श्रावणाआधी अधिक श्रावण मास येत आहे. त्यालाच `मलमास' किंवा 'पुरुषोत्तम मास' असेही प्रामुख्याने म्हटले जाते. मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. यंदा १८ जुलै ते १६ ऑगस्ट अधिक श्रावण असणार आहे, त्यानिमित्ताने विविध प्रकारचे संकल्प केले जातात. त्याबाबद्दल पुढच्या लेखात सविस्तर माहिती जाणून घेऊच, तूर्तास एकभुक्त व्रताची माहिती जाणून घ्या. 

एकभुक्त राहणे, म्हणजे दिवसभरातून एकवेळ जेवणे. मुख्यत: चातुर्मासात अनेक जण एकभुक्त राहणे पसंत करतात. मात्र, अधिक मासात एकभुक्त व्रत अंगिकारले, तर ते अधिक फलदायी ठरते, असे हिंदू पंचांगामध्ये लिहिले आहे.

अलीकडच्या काळात, आपण ज्याला 'डाएट' म्हणतो, किंवा आयुर्वेदातील परिभाषेनुसार 'लंघन' म्हणतो, तीच सोय धर्मशास्त्राने व्रत-वैकल्यांच्या नावे करून ठेवली आहे. 

एकभुक्त व्रतामागील हेतू. 

चातुर्मासातील आषाढ, श्रावण, भाद्रपद या तीन महिन्यांत आपल्या देशात पावसाळा असतो. यावेळी पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे शरीराला व पचनसंस्थेला विश्रांती मिळणे, असा एकभुक्त राहण्यामागे हेतू असतो. या तीन पावसाळी महिन्यांना जोडूनच अधिक अश्विन मास आल्यामुळे आपल्यालाही एकभुक्त राहून आरोग्य व आध्यात्म यांचा मेळ घालता येईल. 

मनावर नियंत्रण : 

'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है।' असे म्हणतात. अधिक मासाचे फळ मिळावे, असे वाटत असेल, तर अन्नावरील वासना कमी करून आपल्या दैनंदिन कार्यात, पूजे-अर्चेत मन रमवावे, यासाठी हे एकभुक्त व्रत करता येईल. त्यामुळे आपोआपच मनावर नियंत्रण येते आणि त्याग भावना बळावते. 

प्रतिकुल परिस्थितीत तग धरण्याची शिकवण:

सहा महिन्यांपासून आपण सगळेच जण घरी आहोत. एकवेळ, बाहेर पडल्यावर, कामात गुंतल्यावर तहान-भूकेचे भान राहत नाही, परंतु २४ तास घरात असल्यावर उठ-सूट भूक लागत राहते. अकारण वजन वाढते. स्थूलत्त्व येते आणि पोटाला वरचेवर खाण्याची सवय लागते. घरात असताना ही सवय ठीक आहे, परंतु घराबाहेर असताना आपल्याला सतत अन्नपुरवठा कोण करणार आहे? आणि बाहेर जे अन्न उपलब्ध असते, ते शरीराला हितकारक असेलच असे नाही. अशा वेळी, भूकेवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. अन्यथा कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि आपली चिडचिड होत राहील. अशा व्रतांमुळे संयम अंगी बाणला जातो. शिवाय, दुष्काळ, अन्नटंचाई, आर्थिक टंचाई अशा आस्मानी- सुलतानी संकटात तना-मनाने तग धरता येते आणि मीठ-भाकरीवरही तृृप्तता मानता येते. 

Shravan Somwar vrat 2023:महाफलदायी सोळा सोमवारचे व्रत अधिक श्रावणापासून सुरू करायचे की निज श्रावणात ते जाणून घ्या!

जाणिजे यज्ञकर्म : 

जेवायला बसताना आपण एक श्लोक म्हणतो. 'वदनी कवळ घेता.' त्या श्लोकाच्या शेवटी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे, `उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!' म्हणजेच अन्नग्रहण करताना भगवंताचा आठव करा आणि त्याच्या कृपेने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे, याबद्दल त्याचे आभार माना. शिवाय, जे अन्न ग्रहण करत आहात, ते पोटाची किंवा मनाची तृप्ती व्हावी यासाठी नाही, तर हा एक यज्ञ आहे असे समजा आणि अन्न ही त्या यज्ञातील आहुती समजून, गरज आहे तेवढेच ग्रहण करा. तरच, त्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर होऊन, ती ऊर्जा दिवसभरात चांगल्या कामासाठी वापरली जाईल. 

पोषणकर्ता महाविष्णूंना एकवेळचे जेवण समर्पित :

सृष्टीचालक भगवान महाविष्णूंना मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव-जीवांचे पोषण करायचे असते. त्यांच्या या महत्कार्यात आपला खारीचा वाटा, या भावनेने आपण एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एकवेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे. किंवा एकवेळच्या जेवणाचा शिधा (कोरडे धान्य, तांदूळ, पीठ, तेल, मीठ) द्यावे. एवढ्याशा सेवेने कोणा गरजूचे आशीर्वाद मिळाले, तर ती सेवा भगवान महाविष्णूंच्या चरणी रुजू झाली असे समजावे.

Adhik Maas 2023: 'अधिकस्य अधिकं फलं' अर्थात अधिक मासाचे अधिक फळ पदरात कसे पाडावे? जाणून घ्या!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्नAdhik Maasअधिक महिना