२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
By देवेश फडके | Updated: December 30, 2025 15:17 IST2025-12-30T15:13:05+5:302025-12-30T15:17:15+5:30
2026 Year First Day Shree Swami Samarth Seva: इंग्रजी नववर्ष २०२६ची सुरुवात गुरुवारी होत असून, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून वर्षभर पुण्य कमावण्याची सुवर्ण संधी आहे. जाणून घ्या...

२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
2026 Year First Day Shree Swami Samarth Seva: २०२५ या वर्षांत अनेक शुभ योग, शुभ दिवस, प्रकट दिन, अवतार सांगतेचा दिवस, अद्भूत संयोग गुरुवारी आल्याचे पाहायला मिळाले. आता इंग्रजी नववर्ष २०२६ ची सुरुवातही गुरुवारी होत आहे. गुरुवारी लाखो भाविक श्री स्वामी समर्थ महाराजांची आपापल्या परिने सेवा करत असतात. आताच्या धकाधकीच्या काळात मनात असूनही गुरुवारी स्वामींच्या मठात शक्य होतेच असे नाही. त्यामुळे कुठेही न जाता, घरच्या घरी एकाही पैशाचा खर्च न करता स्वामींची सेवा करू शकता. नेमके काय करावे? जाणून घेऊया...
श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार केला, तरी मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. सकारात्मकता मिळते. वेगळीच ऊर्जा संचारते. प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वांत मोठी लीला मानली गेली आहे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते.
अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा
स्वामी अद्भूत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. श्री स्वामी समर्थांचे माहात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्याचा जो अधिक विचार करावा, तो त्याचे अनंत नवे पैलू आपल्या लक्षात येतात. खरोखरच अद्भूताचा अनुभव येतो. सूर्य किरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा थांगच लागत नाही, असे अनेक जण सांगतात. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे.
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘अशी’ स्वामी सेवा करा!
श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य, नियमित, दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात, अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जो तो आपापल्यापरिने स्वामींची सेवा करत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. समस्या, अडचणी, संकटे, चणचण, भय अशा अनेक गोष्टींवर स्वामींचा तारक मंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
‘तारक मंत्र’ म्हणजे स्वामींची शक्ती अगम्य शक्ती
‘तारक मंत्र’ या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करताच. तारक मंत्र स्वरुपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते. जर हा मंत्र तुम्ही हळूहळू, संथ लयीत म्हटला तर खूपच बळ देतो, अंगात शक्ती संचारते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे.
तारक मंत्राचा प्रभावी उपाय
तारक मंत्रामध्ये ताकद आहे. ११ वेळा तारक मंत्र म्हणायचा. प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे वेगळीच सकारात्मकता, प्रेरणा मनात निर्माण होते. यासाठी एका पैशाचा खर्च होत नाही. कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. मनापासून सेवा करावी. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. या उपायाने वर्षभर पुण्य तर मिळेलच, शिवाय घरातील नकारात्मकताही दूर होऊ शकेल. अतिशय सकारात्मक आणि समर्पण भाव ठेवूनच ११ वेळा तारक मंत्राचे पठण करावे. कोणताही नकारात्मक विचार त्या कालावधीत मनात येऊ देऊ नये. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी. स्वामी समस्या, संकटातून तारतील, योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील, असा विश्वास ठेवावा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते, असा अनेकांचा अनुभव आहे.
तारक मंत्राची अनेकांना प्रचिती
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रात एक कडवे आहे की, ‘अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी’, फक्त आणि फक्त या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा. त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, असेही स्वामी भक्त, उपासक सांगतात. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखांतून संरक्षण आणि आधार प्रदान करतो, असे मानले जाते.
स्वामींचा अत्यंत प्रभावी तारक
निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ॥१॥
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकही ना भीती तयाला ॥२॥
उगाची भीतोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ॥३॥
खरा होई जागा तू श्रद्धेसहित
कसा होशी त्यावीण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ॥४॥
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वमीच या पंचप्राणामृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ॥५॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥