शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२०२६ मधील पहिले सूर्यग्रहण, ४.३२ तास असेल प्रभाव; भारतात कुठे दिसणार? पाहा, सूतक काल वेळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:07 IST

Solar Eclipse 2026 Date Time: फेब्रुवारी महिन्यात २०२६ मधील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. सविस्तर जाणून घ्या...

Solar Eclipse 2026: २०२६ मध्ये फेब्रुवारी महिन्यात पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. सूर्यग्रहण अमावास्येला होते. अमावास्येचा क्षण म्हणजे सूर्य-चंद्र युतीचा क्षण असतो. प्रत्येक वर्षी किमान दोन सूर्यग्रहणे होतातच. एखाद्या वर्षी सूर्यग्रहणांची कमाल संख्या ४ किंवा ५ असू शकते. सूर्यग्रहणाचे खंडग्रास सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण इ. प्रकार होतात. फेब्रुवारी महिन्यात लागणारे सूर्यग्रहण कंकणाकृती प्रकारातील असणार आहे. जाणून घेऊया...

काही वेळा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका प्रतलात, एका रेषेत असताना चंद्र पृथ्वीपासून दूर अंतरावर असेल तर चंद्राचा आकार सूर्यापेक्षा कमी राहतो. अशा वेळेस सूर्याच्या समोर येऊनही तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशा वेळेस चंद्र सूर्यासमोर आलेला असताना सूर्याचा काही भाग चंद्राच्या सर्व बाजूंनी झळाळताना दिसतो. तेजस्वी बांगडीसारख्या दिसणाऱ्या या घटनेला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. प्रत्येक ग्रहणात विरळ सावली पृथ्वीवर पडू शकते, पण चंद्राच्या बदलत्या अंतरामुळे गडद सावली पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतेच असे नाही. असे घडल्यास खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण होते. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये सूर्यग्रहणाला अनन्य महत्त्व आहे. 

२०२६ मधील पहिले सूर्यग्रहण कधी लागणार?

२०२६ मधील पहिले सूर्यग्रहण मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी होईल. हे ग्रहण ३ वाजून २६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७ वाजून ५७ पर्यंत असेल. ग्रहणाचा एकूण कालावधी अंदाजे ४ तास ३२ मिनिटे असेल. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या साधारण बारा तास आधी सूतक काल सुरू होईल, असे म्हटले जात आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे, ज्यामध्ये सूर्य पूर्णपणे झाकलेला नसून, सूर्याचा बाह्य भाग तेजस्वी बांगडीसारखा दिसतो. हे सूर्यग्रहण कुंभ राशीत होईल. कंकणाकृती सूर्यग्रहण लागेल, तेव्हा कुंभ राशीत सूर्य, राहु, बुध, शुक्र हे ग्रह विराजमान असतील. तसेच सिंह राशीतील केतु ग्रहाची दृष्टी या ग्रहांवर असणार आहे. तसेच हे सर्व ग्रह एकमेकांशी समसप्तक स्थानी असणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतुमुळे होणारे सूर्यग्रहण कधीकधी मानसिक ताण, गोंधळ आणि अनिश्चितता वाढवू शकते. 

२०२६ मधील सूर्यग्रहणाचा स्पर्श, मोक्ष काळ कधी?

कंकणाकृती सूर्य ग्रहण सुरू: ३ वाजून २६ मिनिटे

कंकणाकृती सूर्य ग्रहण मध्य: ५ वाजून ४२ मिनिटे

कंकणाकृती सूर्य ग्रहण मोक्ष: ७ वाजून ५७ मिनिटे

२०२६ मधील कंकणाकृती सूर्यग्रहण कुठे दिसणार?

२०२६ मधील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, टांझानिया, नामिबिया, मॉरिशस, अंटार्क्टिका, दक्षिण अर्जेंटिना, चिली आणि आसपासच्या भागात दिसेल. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, सूर्यग्रहण ज्या भागात प्रत्यक्ष दिसते, तिथे सर्वांत जास्त त्याचा प्रभाव असतो, असे मानले जाते. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : 2026 Solar Eclipse: Timing, visibility, and impact explained.

Web Summary : The first solar eclipse of 2026, a 4.32-hour annular eclipse, occurs on February 17th. It will be visible in parts of Africa, Antarctica and South America but not in India. Expect astrological impacts on Kumbha Rashi.
टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणsurya grahanसूर्यग्रहणspiritualअध्यात्मिक