शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

जयदत्त क्षीरसागरांची हॅटट्रिक हुकली; संदीप यांची पहिल्याच प्रयत्नात बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:08 AM

सलग दहा वर्षे लोकप्रतिनिधी राहिलेले जयदत्त क्षीरसागर यांची हॅटट्रिक पुतण्याने बाजी मारत रोखली. गुरुवारी निकालाच्या फेऱ्या समजताना अत्यंत चुरशीचा सामना झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देबीड शहराला तरुण नेतृत्व : क्षणाक्षणाला पारडे फिरवणारा ऐतिहासिक निकाल

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सलग दहा वर्षे लोकप्रतिनिधी राहिलेले जयदत्त क्षीरसागर यांची हॅटट्रिक पुतण्याने बाजी मारत रोखली. गुरुवारी निकालाच्या फेऱ्या समजताना अत्यंत चुरशीचा सामना झाल्याचे दिसून आले. आता विजयानंतर संयमीपणे जनतेची कामे करण्याचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यापुढे आव्हान आहे. तर बीडची मंत्रीपदाची संधी हुकल्याने काका जयदत्त क्षीरसागर यांना सर्वच बाजुने चिंतन करावे लागणार आहे.मागील विधानसभा निवडणुकीत राजकीय सामर्थ्याच्या बळावर जिल्ह्यातून बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसची जागा राखली. परंतू पक्षांतर्गत विरोध आणि झालेल्या कोंडीमुळे त्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसल रामराम ठोकत शिवबंधन बांधले. तसे पाहता जयदत्त क्षीरसागर यांची सेक्युलर प्रतिमा राहिलेली आहे. राजकीय अपरिहार्यता म्हणून क्षीरसागरांनी पक्ष बदलला तरी त्यांची भूमिका जनतेला पचनी पडली नसल्याचे या निकालावरुन दिसते. कारण जो शहरी भाग नेहमी जयदत्त क्षीरसागर यांच्या बाजुने राहिला, त्या भागातून जादा मताधिक्य मिळविता आले नाही. परिणामी दहा हजाराच्या फरकाने संदीप क्षीरसागर यांनी आघाडी घेतली.ग्रामीण भागातून चांगले समर्थन मिळाल्याने ही आघाडी कमी करण्यात जयदत्त क्षीरसागर यांना यश आले मात्र ते विजयापासून दूर राहिले. लोकप्रतिनिधी व मंत्री पदाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासकामे करुनही मागील दहा वर्षातील सत्तेमुळे निर्माण झालेला अ‍ॅन्टी इनकम्बन्सी फॅक्टर दूर करण्यात कमी पडल्याने क्षीरसागर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पक्ष बदलानंतर शिवसेनेकडून पाठबळ मिळाल्याने मोठी ताकद वाढल्याचे सकृतदर्शनी दिसले. सोबत राहिलेले समर्थक आणि शिवसैनिकांची बेरीज केली. शहरातील मतदार सोबतच आहे, असे मानून प्रचारकार्य झाले. मात्र जनतेने नेतृत्व बदलाचे मनात ठरविले होते, हे निकालाच्या दिवसापर्यंत लक्षात आले नाही.नगर पालिकेत निम्मे नगरसेवक संदीप क्षीरसागर यांच्या काकू- नाना आघाडीचे निवडून आले होते. शहरातील नागरी सुविधांच्या प्रश्नावर लढाऊ बाणा आघाडीने राखला. रस्ते, खड्डे, गढूळ पाण्याच्या विषयावरुन नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क करत जाणीव करुन देण्यात संदीप क्षीरसागर यशस्वी ठरले.युवा नेतृत्व म्हणून निर्माण केलेली क्रेझ, विविध प्रश्नांवर प्रभावी आंदोलन करण्याची धमक, कार्यकर्त्यांसाठी धावून जाण्याची कला, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन यामुळे ‘संदीपभैय्या’ प्रभावी होत गेले. निवडणुकीत सहा माजी आमदार भलेही स्वतंत्र सभा लावू शकले नसलेतरी संदीप यांच्या बाजुने मोठी ताकद त्यांनी उभी केली होती. सत्ताधारी क्षीरसागरांच्या विरोधकांना संयमीपणे एकत्र करण्यात संदीप क्षीरसागरांना यश आले. बदलत्या राजकीय समिकरणातही तरुण म्हणून संधी जनतेने दिली. त्यामुळे संदीप क्षीरसागर हे बीडची जागा राष्टÑवादीकडे राखण्यात यशस्वी ठरले.जनतेची सहानुभूती संदीप क्षीरसागरांच्या पारड्यातशरद पवार ज्या ज्या वेळी राजकीय संकटात आले त्या त्या वेळी बीडने त्यांना साथ दिली. राष्टÑवादी कॉँग्रेसला गळती लागलेली असताना अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: मैदानात उतरत सत्तेची जबाबदारी तरुणांकडे सोपविण्याचे आवाहन केले होते. इडीची कारवाई आणि भर पावसात झालेल्या प्रचारसभेतून मिळालेली जनतेची सहानुभूती संदीप यांच्या पारड्यात मिळाली.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Result Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागर