गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:17 IST2019-02-04T00:16:13+5:302019-02-04T00:17:22+5:30
तालुक्यातील नामलगाव येथे मंगेश रमेश पिंपळे (२२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या
बीड : तालुक्यातील नामलगाव येथे मंगेश रमेश पिंपळे (२२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत नोंद झाली आहे.
मंगेश हा सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. घरी परिस्थिती अतिशय नाजूक आहे. पिंपळे कुटुंबीय भूमिहिन असल्याने आणि जगण्याचे साधन नसल्याने नैराश्येतून मंगेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शनिवारी मध्यरात्रीनंतर गणपती मंदिराच्या मागील पिंपळाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. सकाळी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना त्याचा मृतदेह आढळले. ही माहिती बीड ग्रामीण ठाण्याला दिल्यानंतर परिविक्षाधिन उपअधीक्षक रोशन पंडित, सपोनि शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अशोक सोनवणे, लक्ष्मण जायभाये, भागवत शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. त्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले. मयत मंगेशचा भाऊ उमेश रमेश पिंपळे याच्या खबरीवरुन ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.