युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:35 IST2021-05-18T04:35:28+5:302021-05-18T04:35:28+5:30

वडवणी : तालुक्यातील पुसरा येथील एका ३२ वर्षीय युवकाने बीड परळी हायवेवर पुसरा फाट्यावरील स्वत:च्याच ...

Youth commits suicide by strangulation | युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

वडवणी : तालुक्यातील पुसरा येथील एका ३२ वर्षीय युवकाने बीड परळी हायवेवर पुसरा फाट्यावरील स्वत:च्याच हॉटेलमध्ये पत्र्याखाली असलेल्या लोखंडी पाइपाला पहाटे ४-३० ते ५ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली.

समाधान झोडगे (३२) यांचे बीड परळी हायवेवर पुसरा फाट्यावर हाॅटेल होते. परिसरात हॉटेल व्यावसायिक म्हणून ते परिचित होते. सोमवारी पहाटे शेतात जाणाऱ्या नागरिकांना हाॅटेलच्या आतमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व पाय अर्धे जमिनीवर टेकलेल्या अवस्थेत समाधान झोडगे यांना पाहिले. यावेळी त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झालेली होती. त्यामुळे समाधान झोडगे यांनी आत्महत्या केली घातपात अशी चर्चा सुरू आहे. वडवणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.ए.ठोकरे यांनी केले आहे. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, भाऊ, बहीण, दोन मुली असा परिवार आहे. वडवणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणात नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Youth commits suicide by strangulation