चंपावती क्रीडा मंडळात तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:27 IST2020-12-25T04:27:14+5:302020-12-25T04:27:14+5:30

अक्षय कांबळे (वय २२, रा. बी ॲण्ड सी वसाहत), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती ...

Youth commits suicide at Champawati Sports Club | चंपावती क्रीडा मंडळात तरुणाची आत्महत्या

चंपावती क्रीडा मंडळात तरुणाची आत्महत्या

अक्षय कांबळे (वय २२, रा. बी ॲण्ड सी वसाहत), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलीस हवालदार गणेश परझने, रवींद्र राऊत यांनी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. अक्षय कांबळे हा तरुण मागील काही वर्षांपासून चंपावती क्रीडा मंडळात रात्री झोपण्यासाठी येत होता. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अक्षयचा मोबाइल पोलिसांच्या ताब्यात

घटना घडल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुसाइड नोट किंवा अन्य कारणासाठी झाडाझडती घेतली; परंतु त्याच्याजवळ काहीच मिळून आले नाही. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या जवळचा मोबाइल ताब्यात घेतला असून, त्या आधारावरून आत्महत्येचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Youth commits suicide at Champawati Sports Club