पैसे मागितल्यामुळे तरूणाची आत्महत्या ; एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:11 IST2021-09-02T05:11:56+5:302021-09-02T05:11:56+5:30

सूर्यकांत रमेश वैद्य (वय २५, रा. परळी वेस, अंबाजोगाई) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. सूर्यकांत आराध्याचे गायनाचे कार्यक्रम ...

Youth commits suicide by asking for money; Crime on one | पैसे मागितल्यामुळे तरूणाची आत्महत्या ; एकावर गुन्हा

पैसे मागितल्यामुळे तरूणाची आत्महत्या ; एकावर गुन्हा

सूर्यकांत रमेश वैद्य (वय २५, रा. परळी वेस, अंबाजोगाई) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. सूर्यकांत आराध्याचे गायनाचे कार्यक्रम करत असे. सोमवारी घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील महेश सतीश शिंगनाथ याने माझे पैसे का देत नाहीस असे म्हणत सूर्यकांतला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे खजील झालेला सूर्यकांत घरी आला. त्याच्या डोळ्याला लागलेला मार पाहून भाऊ दिनेशने त्याला त्याबाबत विचारले असता त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. आपण पैशाची व्यवस्था करू, असे म्हणत दिनेशने सूर्यकांतची समजूत घातली. परंतु, सूर्यकांत नैराश्यातून बाहेर आला नाही. अखेर त्याने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. सूर्यकांत घराचा दरवाजा उघडता नसल्याने दिनेशने खिडकी तोडून पाहिल्यानंतर त्याला ही घटना लक्षात आली. याप्रकरणी दिनेशच्या फिर्यादीवरून महेश शिंगनाथ याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Youth commits suicide by asking for money; Crime on one