युवकावर तलवारीने हल्ला, माजलगावातील बायपास रोडवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST2020-12-27T04:24:44+5:302020-12-27T04:24:44+5:30
आकाश शिवाजी पवार (वय २७, रा. चिंचगव्हाण) असे जखमी युवकाचे नाव आहे. शहरातील अशोकनगरमध्ये राहणाऱ्या विकास दिलीप शरणांगत या ...

युवकावर तलवारीने हल्ला, माजलगावातील बायपास रोडवरील घटना
आकाश शिवाजी पवार (वय २७, रा. चिंचगव्हाण) असे जखमी युवकाचे नाव आहे. शहरातील अशोकनगरमध्ये राहणाऱ्या विकास दिलीप शरणांगत या युवकाने फोन करून कुठे आहेस म्हणून विचारले. त्यावेळी आकाशने मी बायपास रोडवरील तात्याच्या हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात विकास तेथे आला व त्याने आकाशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आकाश त्याला शिव्या देवू नको म्हणताच त्याच्या तोंडावर चापटा मारल्या. मोटारसायकलच्या सायलेन्सरजवळ ठेवलेली तलवार आणत आकाशच्या कोपरावर उजव्या हाताच्या मनगटावर वार करून जखमी केले. आकाशवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाशच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात विकास शरणांगत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक तळेकर करत आहेत.