विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, म्हैस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:26+5:302021-01-09T04:28:26+5:30
अशोक राजेंद्र कदम (वय ३३), असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सकाळच्या सुमारास जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी अशोक ...

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, म्हैस जखमी
अशोक राजेंद्र कदम (वय ३३), असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सकाळच्या सुमारास जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी अशोक हे गोठ्यात गेले होते. यावेळी जनावरांना पेंड खायला टाकण्यासाठी ते पाटी आणण्यासाठी गेले होते. यावेळी ती पेंडीची पाटी ही गोड्याच्या पत्र्यावर ठेवलेली होती. याच पत्र्यांतदेखील विजेचा प्रवाह होता. दरम्यान, पाटी घेत असताना त्यांच्या डोक्याला विजेचा जबरदस्त धक्का लागला. या धक्क्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अशोक यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. याची नोंद जिल्हा रुग्णालय चौकीत केली असून, सविस्तर जबाब ग्रामीण पोलिसांना देण्यात येणार आहे.