नेकनूरमध्ये तरुण युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:35 IST2021-08-15T04:35:02+5:302021-08-15T04:35:02+5:30

सय्यद सलमान (वय २२, रा. नेकनूर, ता.बीड) असे विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सय्यद सलमान ...

A young man drowned in a well in Neknur | नेकनूरमध्ये तरुण युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

नेकनूरमध्ये तरुण युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

सय्यद सलमान (वय २२, रा. नेकनूर, ता.बीड) असे विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सय्यद सलमान हा मुलांसोबत गावाजवळील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी सलमानने विहिरीत उडी मारली व तो बुडाला, बराच वेळ वर न आल्यामुळे सोबत गेलेली मुले घाबरली. परिसरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेक जण विहिरीजवळ जमा झाले होते. दरम्यान, नेकनूर ठाण्यात याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सलमान याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. नेकनूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर काळे, पोकाँ. दीपक खांडेकर यांनी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

140821\14_2_bed_22_14082021_14.jpg~140821\14_2_bed_21_14082021_14.jpg

पाण्यात बुडून मृत्यू झालेला तरुण ~विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दिसत आहेत.

Web Title: A young man drowned in a well in Neknur