दारू न पाजल्याने तरुणास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:39 IST2021-09-04T04:39:56+5:302021-09-04T04:39:56+5:30
अंबाजोगाई : धाब्यावर दारू का पाजली नाही, अशी कुरापत काढून रोहन गोविंद फड (वय २२, रा. मूर्ती, ता. अंबाजोगाई) ...

दारू न पाजल्याने तरुणास मारहाण
अंबाजोगाई : धाब्यावर दारू का पाजली नाही, अशी कुरापत काढून रोहन गोविंद फड (वय २२, रा. मूर्ती, ता. अंबाजोगाई) यास ३१ ऑगस्ट रोजी मूर्ती फाट्यावर लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली. गावाकडे जाताना दुचाकी अडवून त्यास रोखण्यात आले. बर्दापूर ठाण्यात गावातील देविदास बाळासाहेब फड विराेधात गुन्हा नोंद झाला.
....
दरडवाडी येथून दुचाकी लंपास
केज : तालुक्यातील दरडवाडी येथून १५ ऑगस्टला बाळासाहेब खंडू दराडे यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १२ एफएल-४९४१) चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी केज ठाण्यात १ सप्टेंबरला तक्रार देण्यात आली. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
...
एकास मारहाण, चौघांवर गुन्हा
पाटोदा : तालुक्यातील उखंडा येथे बाबासाहेब नरहरी अडाळे (रा. उखंडा) यांना घरासमोर दारूच्या नशेत दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी विनाकारण काठीने मारहाण करून डोके फोडले. ३० ऑगस्ट रोजी ही घटना घडली. विकास गणपत बजगुडे, नितीन गणपत बजगुडे, गणपत किसन बजगुडे, संतोष गणपत बजगुडे (सर्व, रा. निरगुडी, ता. पाटोदा) यांच्यावर पाटोदा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.