जातेगावात तरुणास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:37+5:302021-08-12T04:37:37+5:30
... पुनंदगाव येथे हॉटेलचालकास मारहाण वडवणी : तालुक्यातील पुनंदगाव येथे एका हॉटेलचालकास फोन करून बोलावून घेत कुऱ्हाडीने हल्ला चढविण्यात ...

जातेगावात तरुणास बेदम मारहाण
...
पुनंदगाव येथे हॉटेलचालकास मारहाण
वडवणी : तालुक्यातील पुनंदगाव येथे एका हॉटेलचालकास फोन करून बोलावून घेत कुऱ्हाडीने हल्ला चढविण्यात आला. ही घटना ८ ऑगस्ट रोजी घडली. अजित गालफाडे (२४, रा. केंडेपिंप्री) असे जखमीचे नाव आहे. सुरेश उर्फ नाना विश्वनाथ शिंदे (रा. राजेवाडी) याच्यावर वडवणी ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
...
धारूरमध्ये चोरट्यांनी बंद घर फोडले
धारूर : येथील वैद्यनाथनगरात अशोक तिडके (रा. बोडखा)
हे किरायाच्या घरात राहतात. ३ ऑगस्ट रोजी ते घर बंद करून बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ८ हजारांचे दागिने व रोख ४० हजार रुपये असा एकूण ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. धारूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.