आत्मदहनाचा प्रयत्न करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:18+5:302021-09-04T04:40:18+5:30
बीड : ग्रामपंचायत सदस्याने केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप करत तालखेड (ता. माजलगाव) येथील एका तरुणाने ...

आत्मदहनाचा प्रयत्न करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
बीड : ग्रामपंचायत सदस्याने केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप करत तालखेड (ता. माजलगाव) येथील एका तरुणाने ३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी प्रसंगावधान राखत त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
विलास कैलास मादंड (२९, रा. तालखेड) असे त्या तरुणाचे नाव आहे. तालखेड येथे तो कुटुंबासह राहतो. त्यांच्या जागेत ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील यांनी अतिक्रमण केल्याचा त्यांचा आरोप आहे. अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी विलास मादंड हे १४ महिन्यांपासून करत आहेत. यासाठी त्यांनी ग्रामसेवकांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. त्यासाठी उपोषण आंदोलनदेखील केले आहे; मात्र याची दखल ग्रामसेवक, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी कोणीच घेतली नाही म्हणून संतप्त झालेल्या विलास मादंड यांनी ३ सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी त्यास ताब्यात घेत शिवाजीनगर ठाण्यात नेले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
...
जीवे मारण्याच्या धमक्या
शासन निर्णयानुसार अतिक्रमण केलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करावे, त्याचबरोबर सरपंच ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विलास मादंड यांनी केली. गावासह इतर ठिकाणच्या राजकीय व्यक्तींकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा आरोप त्याने केला.
--------
030921\img-20210903-wa0179_14.jpg