मांजरा नदीच्या पुरात तरुण शेतकरी बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST2021-09-25T04:36:24+5:302021-09-25T04:36:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मांजरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने मांजरा नदीला आलेल्या पुरात सोयाबीन काढणीसाठी शेतात गेलेला ...

The young farmer drowned in the flood of Manjara river | मांजरा नदीच्या पुरात तरुण शेतकरी बुडाला

मांजरा नदीच्या पुरात तरुण शेतकरी बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : मांजरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने मांजरा नदीला आलेल्या पुरात सोयाबीन काढणीसाठी शेतात गेलेला तरुण शेतकरी वाहून गेला. ही घटना शुक्रवारी (दि.२४) अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथे घडली.

राम बाबासाहेब कदम (वय ३१, रा. तडोळा) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी राम त्याच्या चुलत भावासोबत शेतात गेला होता. रामचे शेत मांजरा नदीकाठी आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग असल्याने मांजरा नदीला सध्या पूर आलेला आहे. त्यामुळे नदीचे पाणी रामच्या शेतात घुसून सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. डोळ्यादेखत पिकाचे नुकसान दिसत असल्याने राम शक्य होईल तेवढे काठावरचे सोयाबीन काढण्याच्या प्रयत्नात होता. सोयाबीन काढत असताना त्याला पाण्याच्या प्रवाहाने ओढून घेतले. भावाच्या डोळ्यासमोर राम वाहून गेला.

...

प्रशासनाकडून शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईचे तहसीलदार बिपीन पाटील हे तडोळा परिसरात दाखल झाले आहेत. मांजरा नदीच्या प्रवाहात बेपत्ता झालेल्या राम कदम याचा शोध सुरू आहे. रामच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार असून, राम बेपत्ता झाल्याने सर्वजण हवालदिल झाले आहेत.

...

240921\img-20210924-wa0076.jpg

राम बाबासाहेब कदम

Web Title: The young farmer drowned in the flood of Manjara river