स्वस्त धान्य दुकानात आता बाजरी, मका मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST2021-03-06T04:31:21+5:302021-03-06T04:31:21+5:30
तालुक्यात एकूण १२० स्वस्त धान्य विक्रेते आहेत. या दुकानदारांकडे २ हजार ९३६ अंत्योदय कार्डधारक आहेत. अन्नसुरक्षा योजनेचे १७ ...

स्वस्त धान्य दुकानात आता बाजरी, मका मिळणार
तालुक्यात एकूण १२० स्वस्त धान्य विक्रेते आहेत. या दुकानदारांकडे २ हजार ९३६ अंत्योदय कार्डधारक आहेत. अन्नसुरक्षा योजनेचे १७ हजार ८९२ कार्डधारक आहेत. शेतकरी योजनेत ७ हजार १७९ कार्डधारक आहेत. शासनाने भरडधान्य योजनेत मागील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये बाजरी, मका हमीभावाने खरेदी केली होती. खरेदी करण्यात आलेले धान्य आता रेशनवरील अंत्योदय व अन्न सुरक्षेतील कार्डधारकांना वाटप करण्यात येणार आहे. गव्हाऐवजी हे धान्य देण्यात येणार आहे. अंत्योदय कार्डधारकांसाठी २० किलो मका, ३ किलो गहू तर १२ किलो तांदूळ देण्यात येणार आहे. अन्नसुरक्षा योजनेतील कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ३ किलो बाजरी, दोन किलो तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. तर शेतकरी योजनेतील कार्डधारकांना पूर्वीप्रमाणे प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ वाटप असणार आहे. प्रथमच शासनाने कार्डधारकांना मका आणि बाजरीचे वाटप करण्यात येत आहे. धारूर तालुका हा डोंगराळ परिसर असल्यामुळे या भागांमध्ये बाजरी या पिकाचे बऱ्यापैकी उत्पादन शेतकरी घेत आहेत. यामुळे बाजरीचा उपयोग रोजच्या आहारामध्ये करण्यात येत आहे. कार्डधारकांना आता अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील कार्डधारकांना आता मका आणि बाजरीचे वाटप करण्यात येणार असल्याचे आदेश तहसील प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. रेशन दुकानदारांनी परमिट घेतल्यानंतर दुकानदारांना बाजरी आणि मका ही द्वारपोच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.