कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात रुग्णांंना योगाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST2021-05-24T04:32:02+5:302021-05-24T04:32:02+5:30

धारूर : शहरातील कस्तुरबा गांधी कोविड केंद्रावर भाजप नेते रमेश आडसकर यांनी कोविड सेंटर सुरू केले आहे. या केंद्रावर ...

Yoga lessons for patients at Kasturba Gandhi Kovid Center | कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात रुग्णांंना योगाचे धडे

कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात रुग्णांंना योगाचे धडे

धारूर : शहरातील कस्तुरबा गांधी कोविड केंद्रावर भाजप नेते रमेश आडसकर यांनी कोविड सेंटर सुरू केले आहे. या केंद्रावर असलेले रुग्ण केवळ गोळ्या व आहार घेऊनच रुग्ण बरे होत असतात असे नाहीत. तर कोविड रुग्णांना मानसिक स्वास्थ्यासाठी योगाही आवश्यक आहे. यासाठी सामजिक दायित्व म्हणून किल्ले धारुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेशराव शिनगारे यांनी रविवारी सकाळी येथील रुग्णांना दोन तास योगासनाचे धडे देत कोरोनावर मात करण्यासाठी मार्गदर्शन केले.

यावेळी कोविड सेंटरचे व्यवस्थापक ऋषिकेश ढगे, बाबूराव पुजदेकर, नर्सिंग स्टाफ उपस्थित होता. हे कोविड केंद्र शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मोकळ्या निसर्गरम्य वातावरणात आहे. यामुळे येथील अनेक रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी जात आहेत.

===Photopath===

230521\anil mhajan_img-20210523-wa0069_14.jpg

===Caption===

कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात रुग्णांंना योगाचे धडे

Web Title: Yoga lessons for patients at Kasturba Gandhi Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.