यादवराज फड यांच्या बहारदार गायनाने सप्ताहात आली रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:41+5:302021-03-08T04:31:41+5:30
पं. यादवराज फड यांनी कार्यक्रमाची सुरुवात पंचपदीने केली. त्यानंतर भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग, येई वो येई ...

यादवराज फड यांच्या बहारदार गायनाने सप्ताहात आली रंगत
पं. यादवराज फड यांनी कार्यक्रमाची सुरुवात पंचपदीने केली. त्यानंतर भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग, येई वो येई रंगा येई वो येई, तुम्ही सनकादिक संत, तुझीए निढळी कोटी चंद्र प्रकाश, माझे माहेर पंढरी, अशा एकाहून एक सरस रचना सादर करून सप्ताहात रंगत आणली. लोकांच्या आग्रहास्तव मै भूली घर जाने बाट ही संत तुकाराम महाराजांची हिंदी रचना सादर केली. आहारे सावळीया कशी वाजवली मुरली, देहूडा चरणी वाजवितो वेणू या दोन रंगतदार गौळणी सादर करून कार्यक्रमात रंगतीचा कळस गाठला. उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता शेवटची विनवणी संत जनी परिसावी या भैरवीतील अभंगाने केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत संयोजन पं. यादवराज फड यांचे होते. तबला- विशाल मोरे, हार्मोनियम - गोपाळ सूर्यवंशी, टाळ- विजय जाधव , गायन साथ मनोहर मुंडे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवणारी साथसंगत केली. कार्यक्रमाचे संयोजन संजय फड यांनी तर सुधीर चाटे यांनी आभार मानले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
070321\img-20210307-wa0221_14.jpg