चिंताजनक; बाधितांचा आकडा तीनशेपार, वृद्धाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST2021-03-22T04:30:33+5:302021-03-22T04:30:33+5:30
जिल्ह्यात शनिवारी १७०८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यातील १३७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले ...

चिंताजनक; बाधितांचा आकडा तीनशेपार, वृद्धाचा बळी
जिल्ह्यात शनिवारी १७०८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यातील १३७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ३३६ अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक १५८, अंबाजोगाई ७१, आष्टी १८, धारूर २, गेवराई ८, केज २०, माजलगाव २३, परळी १५ , शिरूर १ व वडवणी तालुक्यातील ५ रूग्णांचा समावेश आहे. तसेच सांगवी (ता.केज)येथील ८३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तशी नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. जिल्ह्यात उपचार घेणारे १६५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता एकूण बाधितांचा आकडा २२ हजार ३५३ इतका झाला असून यापैकी २० हजार ५२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ६०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.