मजुरीदर वाढविण्याची श्रमिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:34+5:302021-07-12T04:21:34+5:30
-------------------------- पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहनधारक चिंतेत अंबाजोगाई : पेट्रोल व डिझेलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेल्याने आता वाहनधारकांमध्ये चिंता ...

मजुरीदर वाढविण्याची श्रमिकांची मागणी
--------------------------
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहनधारक चिंतेत
अंबाजोगाई : पेट्रोल व डिझेलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेल्याने आता वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे. वाहनधारक भाडेवाढही करू शकत नसल्याने त्यांना वाहन चालविणे जिकरीचे होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केलेली आहे.
-----------------------
खाद्यपदार्थांची उघड्यावर विक्री; आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात ठिकठिकाणी उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी पदार्थ कधीही झाकून ठेवले जात नाहीत. तशीच त्या पदार्थांची विक्री करण्यात येते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
---------------------------
अंबाजोगाई शहरात व्हायरल फिव्हरची साथ
अंबाजोगाई : वातावरणात बदल झाल्याने शहरात व्हायरल फिव्हरची साथ असून, सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी आदी लक्षणे घेऊन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. व्हायरल फिव्हरचे प्रमाण सर्वच वयोगटात असून, ज्येष्ठ नागरिकांमध्ये अंगदुखी, डोकेदुखी ही लक्षणे अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता उपचार घ्यावे, असे आवाहन डॉ. गणेश खंदारकर यांनी केले आहे.
--------------------------
सकाळी फिरताना नियम पाळणे गरजेचे
अंबाजोगाई : कोविड - १९च्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्याबाबत शासन व प्रशासनाने आदेश दिले आहेत.
याबाबत निर्बंध लागू केले आहेत. परंतु सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदान, सायकलिंगसाठी सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत परवानगी देण्यात आली असली, तरी वेळेचे बंधन पाळले जात नाही. तसेच अंतर न पाळता समुहाने व्यायाम केला जात असल्याने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.