चकलांबा येथील रोकडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST2021-03-27T04:34:43+5:302021-03-27T04:34:43+5:30
बीड : जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात सलग १३८ वर्षांची नाट्य परंपरा सुरू असलेल्या श्री रोकडेश्वर अर्थात श्री हनुमान ...

चकलांबा येथील रोकडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरू
बीड : जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात सलग १३८ वर्षांची नाट्य परंपरा सुरू असलेल्या श्री रोकडेश्वर अर्थात श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार भाविकांच्या मदतीने सुरू आहे. भव्य स्वागत कमानीनंतर आता मंदिराच्या गाभाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास दहा लाखांचा खर्च येणार असून, आतापर्यंत पाच लाखांचा निधी भाविकांनी जमा केला आहे. उर्वरित निधी जमा होणे गरजेचे आहे. भाविकांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन मंदिर जीर्णोद्धार समितीने केले आहे
चकलंबा येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री रोकडेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा पुरातत्त्व खात्याकडे मागणी केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले तत्कालीन आ. बदामराव पंडित, अमरसिंह पंडित व श्रीकांत जोशी यांच्या स्थानिक निधीतून सभागृहाचे काम करण्यात आले. तसेच विद्यमान आ. लक्ष्मण पवार यांनी पेव्हर ब्लॉकसाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र आणखी बरीच कामे होणे गरजेची आहे. जी मूर्ती आहे त्या ठिकाणी अरुंद जागा असल्याने ती वाढवणे गरजेचे होते. त्यामुळे हा गाभारा मोठा करून सुशोभित आणि कोरीव काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी जवळपास दहा लाखांची गरज आहे. गावातील स्थानिक भाविकांच्या मदतीने ५ लाखांचा निधी जमा झाला असून, उर्वरित आणखी ५ लाखांची गरज आहे. ज्या भाविकांनी निधी दिला नसेल, त्यांनी तो थेट समितीच्या नावाने जमा करावा, जेणे करून कामाला गती मिळेल.
कोरोनाचे सावट
दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ३ दिवसांचा मोठा उत्सव साजरा केला जातो, तसेच सलग १३८ वर्षांपासून गावातील कलाकार मंडळी सामाजिक, कौटुंबिक नाटकांचे प्रयोग सादर करत असतात. मात्र कोरोना काळात गेल्यावर्षी उत्सव होऊ शकला नाही आणि पुढील महिन्यात होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे सध्या मंदिराच्या गाभाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे
===Photopath===
260321\262_bed_14_26032021_14.jpeg
===Caption===
चकलंबा येथील रोकडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरू केले आहे.