पावसाच्या हजेरीने कामाचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:48+5:302021-06-27T04:21:48+5:30
मोठ्या पावसाची प्रतीक्षा शिरूर कासार : पिकाला जीवदान मिळाले असले तरी तालुक्यात अजूनही नदी, नाले कोरडे आहेत. मोठ्या पावसाची ...

पावसाच्या हजेरीने कामाचा खोळंबा
मोठ्या पावसाची प्रतीक्षा
शिरूर कासार : पिकाला जीवदान मिळाले असले तरी तालुक्यात अजूनही नदी, नाले कोरडे आहेत. मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. होत असलेला पाऊस हा तणपोशा असून शेतातील पिकात तणवाढीला बळकटी देणारा असल्याचे शेतकरी सांगतात.
कालिका देवीची ब्रह्मकमळाने पूजा
शिरूर कासार : येथील अनिल गाडेकर यांच्या घरी तीन दिवसांपासून ब्रह्मकमळाला फुले लगडली जात असल्याने सुगंधी, पांढऱ्या शुभ्र फुलांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर, कुलदेवी कालिका तसेच विश्वमाउली संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूजन केले. संत भगवानबाबा यांच्या प्रतिमेलाही फुले वाहिली.
फोटो
शाहू महाराज जयंती साजरी
शिरूर कासार : येथील तहसील कार्यालयात शनिवारी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. या वेळी नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी बाळू खेडकर, नायब तहसीलदार पालेपाड, ज्ञानेश्वर पठाडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
===Photopath===
260621\img-20210624-wa0032.jpg
===Caption===
ब्रम्हकमळाने देवीची पुजा