गोटेगाव येथे मग्रारोहयोची कामे कागदोपत्रीच - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST2021-03-18T04:33:40+5:302021-03-18T04:33:40+5:30
केज तालुक्यातील गोटेगाव येथील ग्रामपंचायतीने ११ जून २०२० ते १७ जून २०२० या कालावधीत मग्रारोहयोच्या कामात बोगस लाभार्थी दाखवून ...

गोटेगाव येथे मग्रारोहयोची कामे कागदोपत्रीच - A
केज तालुक्यातील गोटेगाव येथील ग्रामपंचायतीने ११ जून २०२० ते १७ जून २०२० या कालावधीत मग्रारोहयोच्या कामात बोगस लाभार्थी दाखवून मस्टर क्रमांक ७७७, ७७८, ७७९ व ८५२ या अन्वये बांधबंदिस्तीचे काम कागदोपत्री दाखविले. मजुरांच्या नावे बँकेत खाते उघडून मजुराच्या परस्पर बँकेतून लाखो रुपये उचलण्यात आले आहेत. हजेरी पटावर दाखविलेले मजूर वेगळे आणि बँकेच्या खात्यात दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर रक्कम टाकण्यात आली आहे. हजेरी पटावर तीन कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तीसाठी मात्र एकच जाॅब कार्ड नंबर दिलेला आहे. यादीतील अनुक्रमांक १ ते ६ हे व्यक्ती वेगवेगळ्या कुटुंबातील असूनही ते एकत्रित कुटुंबात दाखविले आहेत. यात दाखविलेला जाॅब कार्ड नंबर एम.एच-१८-००५-००३३-००१/२७ असा आहे . हजेरी पटावर मयताची नावे व शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्याची, शासकीय कर्मचारी व अंगणवाडी सेविकेचेही नाव रोजगार मस्टरवर दाखविण्यात आले आहे. मागील तीन वर्षांच्या काळात सरपंच व ग्रामसेवकांनी मिळून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी दत्ता पवार यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांना विचारणा केली असता त्यांनी या कामाची चौकशी जिल्हा स्तरावरून चालू असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.