बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा रस्त्यावरील पुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST2021-04-04T04:34:25+5:302021-04-04T04:34:25+5:30
गेवराई : तालुक्यातील महत्त्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा हा सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब ...

बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा रस्त्यावरील पुलाचे काम रखडले
गेवराई : तालुक्यातील महत्त्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा हा सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. आता हा रस्ता अत्यंत चांगला झाला आहे. मात्र रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. या अर्धवट पुलामुळे रात्रीच्या वेळेला अपघात होण्याची भीती असून हे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने, शेख मोहसिन यांनी केली आहे.
तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असलेला व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा या सोळा किलोमीटर अंतराच्या राज्य मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाला होता. त्यात या रस्त्याला दोन वर्षापूर्वी निधी मिळून चांगले कामपण झाले आहे. मात्र याच रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी मोठ्या पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. हे सर्व पूल अर्धवट अवस्थेत असून याचे काम देखील बंद पडले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठी गावे असल्याने नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये -जा चालू असते. त्यामुळे या अर्धवट रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करून पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने,शेख मोहसिन सह अनेकांनी केली आहे.
तीन पुलांचे काम
या रस्त्यावर तीन पुलाचे काम चालू आहे.
रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
अर्धवट पुलामुळे रात्रीच्या वेळेला पुलाचे खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका होऊ शकतो.
त्यामुळे हे रखडलेल्या पुलाची कामे त्वरित करावीत, अशी मागणी होत आहे.
===Photopath===
020421\225920210402_151614_14.jpg