बलभीम महाविद्यालयात महिला शिक्षण दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:59+5:302021-01-04T04:27:59+5:30
बीड : येथील बलभीम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन साजरा ...

बलभीम महाविद्यालयात महिला शिक्षण दिन
बीड : येथील बलभीम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. डाॅ. महादेव साखरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डाॅ. भारत दहे, डाॅ. सूचिता खामकर, डाॅ. शैलेश आकुलवार, डाॅ. रवींद्र काळे, प्रा. मुदिराज यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
विनायक प्राथमिक शाळेत जयंती उत्साहात
बीड : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन विनायक प्राथमिक शाळेत बालिका दिन, महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका कीर्ती पांगारकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. गव्हाणे, बाळू काळे, महानंदा मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश भागडे, आभारप्रदर्शन तन्वीर पठाण यांनी केले.