नारीचा सन्मान एक दिवस नव्हे वर्षभर करायला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:42+5:302021-03-13T04:58:42+5:30
आष्टीत उत्कृष्ट नऊ नारींचा सन्मान आष्टी : महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस ‘जागतिक ...

नारीचा सन्मान एक दिवस नव्हे वर्षभर करायला हवा
आष्टीत उत्कृष्ट नऊ नारींचा सन्मान
आष्टी : महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र, हा एक दिवसच नव्हे तर वर्षभर नारींचा सन्मान करायला हवा, असे प्रतिपादन प्राजक्ता सुरेश धस यांनी केले. आष्टी उत्कृष्ट नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रियंका फंड, मनीषा चौरे, मोनिका भुजबळ आदी उपस्थित होत्या.
यावेळी उत्कृष्ट पोलीस - शामल थोरात, उत्कृष्ट कृषी सहाय्यक - अंजली टकले, उत्कृष्ट कनिष्ठ सहाय्यक - प्रियंका काळे, उत्कष्ट बचतगट व्यवस्थापक - मंगल विधाते, उत्कृष्ट बचतगट - जयबूनबी उस्मानखान पठाण, उत्कृष्ट कलाकृती - वंदना द्वारके यांचा ‘उत्कृष्ट नारी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
महिलांनी सशक्त असावे
भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात दमयंती धोंडे म्हणाल्या, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात सशक्त असायला हवे. विविध क्षेत्रात महिला प्रभावीपणे काम करत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी अभय धोंडे, तुषार काळे उपस्थित होते. कार्यक्रमात कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉ. रूपाली राऊत, उत्कृष्ट संगीत शिक्षिका - मालन साबळे, उत्कृष्ट परिचारिका - अनुसया गोरख यांना ‘उत्कृष्ट नारी सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव अविशांत कुमकर, निसार शेख, जावेद पठाण, यशवंत हंबर्डे, संतोष नागरगोजे, अण्णासाहेब साबळे, अक्षय विधाते, संजय खंडागळे, अशोक मुटकुळे आदींनी परिश्रम घेतले.
===Photopath===
110321\11bed_2_11032021_14.jpg
===Caption===
आष्टी येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा नारी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.