महिला सर्वांगीण सक्षम होणे गरजेचे-- अरुंधती पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:42+5:302021-01-08T05:47:42+5:30
साळुंकवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्यसाधून मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्पाच्या महिला आत्मभान केंद्रांचे व बालविवाह प्रतिबंधक ...

महिला सर्वांगीण सक्षम होणे गरजेचे-- अरुंधती पाटील
साळुंकवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्यसाधून मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्पाच्या महिला आत्मभान केंद्रांचे व बालविवाह प्रतिबंधक समितीच्या फलकाच्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विद्या माले, उद्घाटक मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहिया तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुंधती पाटील होत्या. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच संजीवनी बेलदार, माजी सरपंच सुधाकर माले, ग्रामसेवक बालाजी मेंगले, डॉ.गणेश माले, ॲड. शिवराज साळुंके, दत्ता खांडापुरे, इंद्रशेखर कर्वे, बाळासाहेब कर्वे, महानंदा जगदाळे, अर्चना कसाब, विक्रम नवले यांची उपस्थिती होती.
यावेळी अनिकेत लोहिया म्हणाले, या केंद्राच्या माध्यमातून महिलांचा बौद्धिक व शारीरिक विकास व्हावा म्हणून वाचनालय सुरू करण्यात आले असून क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांचा सर्वांगीण विकास करून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर कसाब यांनी मानवलोकचे उमाकांत गोदाम, बालाजी वाघमारे, जयश्री शिर्के, स्वप्नाली निलंगे, उमाकांत प्रेरक बाळासाहेब जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.