महिला शेतकरी मेळावा उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST2021-01-09T04:27:59+5:302021-01-09T04:27:59+5:30
या कार्यक्रमास विविध बचत गटातील ५३ महिला उपस्थित होत्या. सुरूवातीला के.व्हि.के. चे कार्यक्रम समन्वयक, डाॅ.अजय किनखेडकर यांनी मार्गदर्शन करीत ...

महिला शेतकरी मेळावा उत्साहात साजरा
या कार्यक्रमास विविध बचत गटातील ५३ महिला उपस्थित होत्या.
सुरूवातीला के.व्हि.के. चे कार्यक्रम समन्वयक, डाॅ.अजय किनखेडकर यांनी मार्गदर्शन करीत विविध बचत गटांच्या शेतकरी महिलांना कुटिरोद्योग करण्याबाबत सुचविले. डाॅ. संजूला भावर यांनी के. व्हि.के. विषयी सविस्तर माहिती दिली. प्रा.के.एल. जगताप यांनी शेतीला कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालनसारखे जोडधंदे जोडण्याचे आवाहन केले. डाॅ. सुरपाम यांनी वेगवेगळ्या द्विदल धान्यापासून दाळ करणे, पॅकिंग करून जास्तीत जास्त आर्थिक फायदा कसा होईल या विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सतीश चव्हाण यांनी महिलांना मार्गदर्शन करून त्यांच्या उन्नतीसाठी पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी संगीता आरबाड यांनीही मनोगत व्यक्त केले. लातूर येथील महिला उद्योजक आशा भिसे यांचे थेट प्रक्षेपण उपस्थित महिलांना दाखविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.के.एल. जगताप यांनी केले. डाॅ संजूला भावर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक इंगळे, प्रभाग समन्वयक राहुल ढोकणे, गजेंद्र आढावे, विजयकुमार चांदणे, इंद्रजित खटिंग, उमेेश वारे व गावातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.