प्रशासनाच्या कार्यावर महिला आयोग असमाधानी; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली उघड नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2023 18:14 IST2023-03-01T18:14:26+5:302023-03-01T18:14:35+5:30
महिला आयोग आपल्या दारी या अंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या.

प्रशासनाच्या कार्यावर महिला आयोग असमाधानी; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली उघड नाराजी
महिला आयोग आपल्या दारी या अंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी झाली. महिलांच्या तक्रारी सोडवण्यात आल्या. यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चाकणकरांनी प्रशासनाच्या कार्यावर महिला आयोग असमाधानी असल्याचं म्हटलं आहे.
प्रशासनाने कामात आणखी सुधार करून घ्यावे, अशी नाराजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे. तर आम्ही सत्तेत नाही म्हणून आमचं काम वेगळं नाही, आम्ही आरडाओरड करत नाहीत. लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही काम करतोय. सत्तेत असताना आम्ही खाकीवर दबाव आणला नाही. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सरकार कोणाचेही असो महिला आयोग न्याय देण्यासाठी काम करतो. आज आमचं आयोग देशात पाचव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी यावेळी दिली.