अंबाजोगाईत ३० वर्षीय महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 16:19 IST2020-08-27T16:07:31+5:302020-08-27T16:19:48+5:30

शेतात ओढत नेऊन केला बलात्कार.

Woman raped in Ambajogai | अंबाजोगाईत ३० वर्षीय महिलेवर बलात्कार

अंबाजोगाईत ३० वर्षीय महिलेवर बलात्कार

अंबाजोगाई : शेतात जनावरांसाठी गवत काढण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय विवाहित महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हबीब दिलावर पठाण (रा. मुलतानी तांडा ) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील साकूड परिसरातील मुलतानी तांडा येथे ३० वर्षीय विवाहित महिला, पती व आपल्या तीन मुलासह राहते. २० ऑगस्ट रोजी पीडित महिला दुपारी जनावरांसाठी गवत आणायला शेतात गेली असता. हबीब याने पाठीमागून येऊन ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे म्हणत तिला ज्वारीच्या शेतात ओढत नेले व तिच्यावर बलात्कार केला. 

या घटनेची वाच्यता केल्यास ‘तुझा पती व मुलांना जीवे मारीन’ अशी धमकी हबीब याने दिल्याने या महिलेने तक्रार देण्यास टाळाटाळ केली. मात्र, तो सतत तिच्या पिछावर पडल्याने या पीडित महिलेने वडिलांना सोबत घेऊन ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 
या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी हबीब दिलावर पठाण याच्याविरुद्ध कलम ३७६, ५०४, भादंवि अन्वये गुन्हा नोंद झाला. आरोपी फरार असून या प्रकरणाचा पोलिस तपास फौजदार मोनाली पवार करत आहेत. 
 

Web Title: Woman raped in Ambajogai