शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

शेतमजुरांच्या हातातील कोयता सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 11:31 PM

येत्या पाच वर्षात ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता काढून त्यांना स्वावलंबी बनवू, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी लाखो जनसमुदास दिला आणि गगनभेदी टाळ्यांनी आसमंत निनादला.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : सावरगावघाट भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याला भक्तांचा जनसागर उसळला...!

अनिल गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कभगवान भक्तीगड, सावरगावघाट : येत्या पाच वर्षात ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता काढून त्यांना स्वावलंबी बनवू, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी लाखो जनसमुदास दिला आणि गगनभेदी टाळ्यांनी आसमंत निनादला.मंगळवारी पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील श्री क्षेत्र भगवान भक्ती गड दसरा मेळाव्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पंकजा मुंडे, डॉ. खा. प्रीतम मुंडे यांच्या विनंतीवरून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे ,खा.प्रीतम मुंडे खासदार सुजय विखे पाटील, ओमराजे निंबाळकर, यशश्री मुंडे, जयदत्त क्षीरसागर, भूपेंद्र यादव, अतुल सावे, हरिभाऊ बागडे, टी.पी. मुंडे, आदिसह मान्यवर उपस्थित होते तर दुसऱ्या व्यासपीठावर राज्यभरातील मंत्री, खासदार आमदार उपस्थित होते.हेलिकॉप्टरने प्रथम मंदिराला प्रदक्षिणा घातली. संत भगवान बाबा मूर्तीचे अमित शहा यांनी पूजन केले. यावेळी बाबांची आरती गाण्यात आली. व्यासपीठावर आगमन होताच त्यांचे संत भगवान बाबांची मूर्ती व ज्ञानेश्वरी आणि फेटा बांधून शहा व सर्वांचे स्वागत करण्यात आले. शहा पुढे म्हणाले की, आज दसºयाच्या शुभदिवशी संत भगवान बाबांच्या विशाल प्रतिमेचे पूजन केले.पंकजा मुंडे म्हणाल्या, भगवान बाबांच्या आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे समाजाला चांगले दिवस आणण्याचे स्वप्न होते. यासाठी मी प्रयत्न करणार असून येत्या पाच वर्षात कामगारांच्या हातातील कोयता काढून स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न असेल. नरेंद्र मोदी, अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व लोकनेते गोपीनाथ मुंडे, भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने गोरगरीब दीनदलित, दुबळा, वंचित, शोषित, घटकांना प्रवाहात आणण्यासाठी जिवाचे रान करणार असल्याचे त्या म्हणाल्या. चार वर्षांपूर्वी हिरकणी बनवून अहंकाराच्या गडावरून खाली उतरले; इथे लाखोंच्या संख्येने जमून तुम्ही मला पाठबळ देत आहात ... तुमचा सन्मान आणि स्वाभिमान मी टिकवणार असून, स्व.मुंडें चे नाव तुमच्या हृदयातील जपण्यासाठी आपण शेवटपर्यंत एक राहू ...असे सांगून त्यांनी तमाम जनसमुदायाला दसºयाच्या शुभेच्छा दिल्या...!प्रास्ताविक खा प्रीतम मुंडे यांनी केले. या मेळाव्याला हरिभाऊ बागडे, अतुल सावे, जयदत्त क्षीरसागर, महादेव जानकर, गोविंद केंद्रे, ह.भ.प. पानेगावकर, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, नारायण कुचे, मोनिका राजळे, आ.सुरेश धस शशिकांत खेडकर ,मोहन जगताप, सुजित सिंह ठाकूर, शीतल सानप, तोताराम कायंदे, बबनराव पाचपुते, मनोहर धोंडे, आर टी देशमुख, ओमराजे निंबाळकर, बाळासाहेब दोडतले आदीसह राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.संत भगवान बाबांच्या कार्याची प्रचितीसंत भगवान बाबांनी जीवनभर शेतकरी व मजुरांना शिक्षणाचा मार्ग दाखवला अंधश्रद्धा दूर केली. या महात्म्याच्या अलौकिक शक्तीची आज अक्षरश: प्रचिती आली, अशी प्रतिक्रि या अभ्यासक प्रा. बिभिषण चाटे यांनी व्यक्त केली.देशभरातील भाविकांचा ओघदेशातील विविध राज्यातील भगवान बाबांचे भक्त बाबांच्या आशीर्वादासाठी चरणी होऊन धन्य होण्यासाठी कालपासूनच येत राहिले... हरियाणा, तेलंगणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आधीसह देशभरातून आलेल्या भक्तांनी आशीर्वाद घेतला.

टॅग्स :BeedबीडDasaraदसराPankaja Mundeपंकजा मुंडेAmit Shahअमित शहा