आमच्या ठेवी मिळतील का? जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटसमोर ग्राहकांची गर्दी, पोलिसांना निवेदन
By अनिल भंडारी | Updated: April 15, 2023 18:21 IST2023-04-15T18:20:58+5:302023-04-15T18:21:44+5:30
शाखा बंद व ‘अफवांवर विश्वास ठेवू नये, ठेवी सुरक्षित’ असल्याचा फलक लावल्याने संभ्रम निर्माण झाला आहे

आमच्या ठेवी मिळतील का? जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटसमोर ग्राहकांची गर्दी, पोलिसांना निवेदन
बीड : शहरातील नगर रोड भागातील संत भगवान बाबा चौक, प्रियदर्शिनी उद्यानाजवळ एसबीआयशेजारी असलेल्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसमोर आज सकाळपासून ठेवीदार, ग्राहकांची मोठी गर्दी जमली होती. आमच्या ठेवी मिळतील का? लॉकरमध्ये ठेवलेले सोने मिळेल का? असे प्रश्न विचारत होते; परंतु याची उत्तरे देणारे संचालक, व्यवस्थापक, प्रमुख कर्मचारी तेथे नसल्याने निरुत्तर झालेल्या ग्राहकांनी अखेर दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासाठी आला मोर्चा वळविला. मिळालेल्या माहितीनुसार या संस्थेत निवृत्त शिक्षका, पोलिस कर्मचारी, सरकारी नोकरदारांसह शेतकरी ग्राहकांच्या एकूण कोट्यवधींच्या ठेवी आहेत.
फलक लावून संस्थाचालक मोकळे
पोलिस अधीक्षक कार्यालयात गेलेल्या ठेवीदारांनी जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सकाळपासून बंद आहे. शाखा बंद असल्याने ठेवी वापस घेणे आवश्यक आहे. शाखा बंद व ‘अफवांवर विश्वास ठेवू नये, ठेवी सुरक्षित’ असल्याचा फलक लावल्याने संभ्रम निर्माण झाल्याने याप्रकरणी तातडीने चौकशी करून योग्य कार्यवाहीची मागणी करण्यात आली.