पत्नीला मारहाण, पतीविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST2021-04-22T04:35:14+5:302021-04-22T04:35:14+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून लव्हरी येथील रहिवासी वैशाली करण खांडेकर यांचे लग्न आठ महिन्यापूर्वी करण मुरलीधर खांडेकर याच्यासोबत झाले होते. ...

Wife beaten, charges filed against husband | पत्नीला मारहाण, पतीविरुध्द गुन्हा दाखल

पत्नीला मारहाण, पतीविरुध्द गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून लव्हरी येथील रहिवासी वैशाली करण खांडेकर यांचे लग्न आठ महिन्यापूर्वी करण मुरलीधर खांडेकर याच्यासोबत झाले होते. दरम्यान, करण हा कोणत्या तरी मुलीला बोलत असल्याचे पत्नी वैशाली हिला कळले होते. दरम्यान, या कारणावरून दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. तसेच ‘माझे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम असून, तु मला घटस्फोट दे’ असे म्हणत रात्री उशिरा करण याने पत्नी वैशाली हिला मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाल्या तसेच अंगावर रॉकेल टाकले. त्यानंतर वैशाली ही जिव वाचवण्यासाठी घराच्या बाहेर पळाली. मिरचीच्या शेतात लपून बसली. नंतर वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर वडिलांसोबत केज पोलीस ठाण्यात जाऊन करण मुरलीधर खांडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Wife beaten, charges filed against husband