शिकविलेच नाही तर शुल्क भरायचे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST2021-05-30T04:26:32+5:302021-05-30T04:26:32+5:30

अंबाजोगाई : वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या दीड वर्षापासून शिकविलेच नाही. उलट पदव्युत्तर विद्यार्थीच दीड वर्षापासून कोरोना ...

Why pay fees if not taught? | शिकविलेच नाही तर शुल्क भरायचे का?

शिकविलेच नाही तर शुल्क भरायचे का?

अंबाजोगाई : वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या दीड वर्षापासून शिकविलेच नाही. उलट पदव्युत्तर विद्यार्थीच दीड वर्षापासून कोरोना वाॅर्डात रुग्णसेवा देत आहेत. आम्हाला शिकविलेच नाही तर शुल्क का भरायचे, असा सवाल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने केला आहे. शुल्कमाफीसाठी त्यांनी निदर्शने केली.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे ११९ निवासी डॉक्टर आहेत. गेल्या दीड वर्षापासून या डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून हे सर्व डॉक्टर कोरोना कक्षात रुग्णसेवा देत आहेत. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. अशा स्थितीतही या विद्यार्थ्यांकडून शासन लाख रुपये शैक्षणिक शुल्क वसूल करीत आहे. हे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे.

मार्डच्या वतीने रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांनी निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात मार्डचे अध्यक्ष डॉ. सुमित साबळे, सचिव डॉ. विद्या लावंड, सचिव डॉ. केदार कुटे, डॉ. दत्ता चिकटकर, डॉ. श्रीधर आघाव, डॉ. केतकी स्वामी, डॉ. कविता सानेर, डॉ. मयुरी राठोड, डॉ. शुभांगी दिलपाके, डॉ. पूजा पाटील, डॉ. उमेश सावजी, डॉ. प्रशिक भगत, डॉ. सायमा, डॉ. अंकिता हंगरगेकर, डॉ. प्रिया उमरे, डॉ. संपदा जवरे, डॉ. शेखा सुब्बा यांच्यासह निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते.

===Photopath===

290521\avinash mudegaonkar_img-20210529-wa0015_14.jpg

Web Title: Why pay fees if not taught?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.