वडिलांना हाॅटेलवर का सोडले म्हणत तलवार, गजाने तिघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:47+5:302021-07-30T04:35:47+5:30

किशोर खंडागळे, चांगदेव खंडागळे हे गंभीर जखमी झाले तर विकास किरकोळ जखमी असून त्याच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार ...

Why did you leave your father at the hotel? | वडिलांना हाॅटेलवर का सोडले म्हणत तलवार, गजाने तिघांना मारहाण

वडिलांना हाॅटेलवर का सोडले म्हणत तलवार, गजाने तिघांना मारहाण

Next

किशोर खंडागळे, चांगदेव खंडागळे हे गंभीर जखमी झाले तर विकास किरकोळ जखमी असून त्याच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील कारखेल येथे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाच जणांनी कुरापत काढून तू माझ्या वडिलांना गावातून शिवदास पवार यांच्या हाॅटेलवर का सोडले, याचा राग मनात धरून जातीवाचक शिवीगाळ केली. तुला गावात राहू देणार नाही, असे म्हणत रामा पवार, भरत पवार यांनी पाठीत, दंडावर लोखंडी गजाने मारून जखमी केले. किशोर खंडागळे व चांगदेव खंडागळे हे मध्यस्थी करत असताना पमा ऊर्फ महेश पवार व नागनाथ पवार यांनी त्यांच्या हातातील तलवारीने जीवे मारण्याच्या उद्देशाने किशोर व चांगदेव याच्या डोक्यात मारून जखमी केले. भरत, रामा पवार यांनी गजाने पाठीत मारून जखमी केले. तेवढ्यात विजू खंडागळे या शेतातून घरी आल्या होत्या. त्या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता भरत पवार याने धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पळ्या व चार मणी तोडून घेतले. विनयभंग केला. या प्रकरणी श्याम भागुजी खंडागळे रा. कारखेल याच्या फिर्यादीवरून आरोपी राजू आबा पवार, भरत बाळू पवार, रामा बाळू पवार, नागनाथ मच्छिंद्र पवार, पमा ऊर्फ महेश मच्छिंद्र पवार, सर्व रा. कारखेल ता. आष्टी. जि बीड यांच्यावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे करीत आहेत.

Web Title: Why did you leave your father at the hotel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.