शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जाचामुळे जीवन संपवलेल्या शुभांगीच्या मृतदेहाला सासरच्यांनी लसूण का चोळला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:00 IST

'पाच लाख दिले तरी त्रास थांबला नाही'; माहेरचे येण्याआधीच मृतदेह खाली उतरवला; शुभांगीच्या आत्महत्येमागे घातपाताचा कुटुंबाचा संशय

- संतोष स्वामीदिंद्रुड (बीड) : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर अजून एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून शुभांगी रूस्तुम सोळंके (वय २५, रा. गीता, अंबाजोगाई) या विवाहितेने गुरुवारी (दि. ६ जून) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करत तिच्या माहेरच्यांनी पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे.

शुभांगीचा विवाह २०२२ मध्ये अंबाजोगाईतील संतोष विलास शिंदे याच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतरपासूनच शुभांगीवर सासरच्या मंडळींकडून पैशांची सतत मागणी होत असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. तिने पाच लाख रुपये दिल्यानंतरही छळ थांबला नाही, उलट तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार वाढले.

गुरुवारी सकाळी शुभांगीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीने तिच्या भावाला फोन करून घटना कळवली. मात्र, शुभांगीचा भाऊ प्रदीप सोळंके यांनी स्पष्ट सूचना दिली होती की “आम्ही येईपर्यंत मृतदेहाला हात लावू नका.” तरीही शिंदे कुटुंबीयांनी तिचा मृतदेह खाली उतरवत, मृतदेहाला लसूण चोळल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहेरच्यांना मृतदेहावर आणि बाजूला ठेचलेला लसूण आढळून आला आहे. या प्रकारामागचं नेमकं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

या प्रकरणी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात सासू सुमन शिंदे, सासरे विलास शिंदे, नणंद सीमा शिंदे, पती संतोष शिंदे आणि व्यवसायिक भागीदार संदीप काचगुंडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली असून, संदीप काचगुंडे अद्याप फरार आहे.

मुलीच्या मृत्यूमागचं सत्य जाणून घ्यायचं आहेविशेष म्हणजे, संदीप काचगुंडे हा भाजपचा पदाधिकारी असून, त्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असल्याचा दावा शुभांगीच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. काचगुंडेला तातडीने अटक करावी, तसेच मृतदेहाची अवहेलना का केली गेली, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सोळंके कुटुंबीयांनी केली आहे. “आम्हाला आमच्या मुलीच्या मृत्यूमागचं सत्य जाणून घ्यायचं आहे. आम्हाला न्याय हवा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी मृत शुभांगीच्या नातेवाइकांनी माध्यमांमार्फत केली.

बाळाचा ताबा चुलत चुलत्याकडेमयत शुभांगी शिंदे हिला दीड वर्षाचा मुलगा आहे. शुभांगीच्या आत्महत्या प्रकरणी सासू-सासरे, पती आणि नणंद अटकेत आहेत. तर दीड वर्षाच्या मुलाचा सांभाळ शुभांगीचा चुलत दीर करत असल्याची माहिती सोळंके कुटुंबांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याdowryहुंडा