शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मित्र असो की पुत्र; नेत्यांनो चारा, पाण्यासाठी कधी बोलणार?

By सोमनाथ खताळ | Updated: April 9, 2024 19:07 IST

पीपल्स मॅनिफेस्टो: शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये संताप : उमेदवारांसह राजकीय नेते केवळ प्रचारातच व्यस्त

बीड : जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एप्रिल महिन्यातच १२२ गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पशुधन जगविण्यासाठी चाराही अपुरा पडत आहे. या गंभीर समस्या असतानाही लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार आणि नेतेमंडळी व्यस्त आहे. सामान्यांच्या हिताच्या चारा, पाण्यावर कोणीच बोलत नाही. केवळ शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र असाच कळवळा दाखवला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार, असा सवाल सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे.

जिल्ह्यात गावे, वाड्यावस्त्यांची संख्या ही दीड हजारांच्या घरात आहे. लोकसंख्याही ३० लाखांच्या जवळपास आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील छोटे-मोठे प्रकल्प कोरडेठाक पडत आहेत. सद्यस्थितीत जलस्त्रोतांमध्ये केवळ १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १२२ गावांत एप्रिलमध्येच टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल पूर्ण महिना आणि मे पूर्ण महिना कसा जाणार? याची चिंता सर्वांनाच आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. चारा नसल्याने बाजारांत पशुधन कवडीमाेल भावात विक्री केले जात आहेत. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो तो आपला प्रचार करण्यातच व्यस्त आहे.

प्रशासन म्हणतेय १९२ दिवस पुरेल चाराजिल्ह्यात लहान, मोठे, शेळी, मेंढ्या असे १३ लाखांच्या घरात पशुधन आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन ३ किलो, तर मोठ्यांसाठी ६ किलो चारा लागतो. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता मुबलक आहे. अजूनही १९२ दिवस चारा पुरेल असा दावा प्रशासनाने केला आहे. असे असले तरी प्रत्यक्षात आजही काही भागात चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. डोंगराळ भाग, रिकाम्या शेतीमध्ये चरायला सोडून पशुधनांचे पोट भरले जात आहे.

जिल्ह्यात १४४ टँकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच १२२ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या १४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात आणखी टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विहीर, बोअर अधिग्रहण केले जात आहे. आतापर्यंत १४३ जलस्त्रोत अधिगृहीत केले आहेत.

हा पाण्याचा अपव्यय कधी थांबवणार?जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत असतानाही आजही काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे. जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर आदी ठिकाणी पाण्याची नासाडी होत आहे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही जागोजागी लिकेज झाल्या आहेत. यामुळेही लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

आवश्यक उपाययोजना तातडीने करादुष्काळजन्य परिस्थितीत पिण्याचे पाणी, चारा, ऊसतोड मजुरांना रेशन यांसह आवश्यक उपाययोजना तातडीने कार्यान्वित करा, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी केली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रशासन स्तरावर बैठका घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे मुंडे यांनी दुष्काळ उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केल्याचे सांगण्यात आले.

अशी आहे आकडेवारीजलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा शिल्लक- १६ टक्केबोअर व विहिरी अधिग्रहित - १४३

कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरूबीड ६०गेवराई ५९शिरूर ६पाटोदा ४आष्टी ९परळी ५धारूर १एकूण १४४

बोअर, विहीर अधिग्रहणबीड २४गेवराई १०वडवणी ५शिरूरकासार ८पाटोदा २अंबाजोगाई ३८केज २२परळी २धारूर २०माजलगाव ८एकूण १४३

टॅग्स :Waterपाणीbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४