शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'बाबा कुठे आहात?'; वडिलांच्या शोधार्थ दोन भावंडांचा दुचाकीवरून ४ हजार किमीचा प्रवास

By सुमेध उघडे | Updated: February 18, 2023 14:39 IST

वडिलांच्या शोध मोहिमेवर असलेल्या भावंडानी हरवलेल्या इतर तिघांची त्यांच्या नातेवाईकांसोबत भेट करून दिली आहे

बीड: पत्नी, दोन  मुले, सुन आणि नातीने भरलेल्या सुखीसंपन्न कुटुंबातील ६४ वर्षीय रत्नाकर अंबादास बोरे हे २८ जुलै २०२१ रोजी नित्यनियमाने मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडले. पण तेव्हापासून ते घरी परतले नाहीत. रात्री कामावरून परत आलेले दोन्ही मुलांनी त्यांचा शहरभर शोध घेतला. पण ते आढळून आले नाही. त्यानंतर सोशल मीडियातून माहिती मिळताच राज्यभर दुचाकीवर प्रवास करत दोन्ही भावंडे वडिलांचा शोध घेत आहेत. राज्यभर विविध शहरात ४ हजार किमीचा प्रवास करूनही या भावडांना वडिलांना शोधण्यात अद्याप यश आले नाही.

बीड शहरातील पांगरी रोडवरील चक्रधर नगर येथे रत्नाकर अंबादास बोरे हे दोन मुलांसह राहतात. सायंकाळी नातीला घेऊन घराजवळच्या मंदिरात जाण्याची त्यांची सवय होती. २८ जुलै २०२१ रोजी नातीची तब्येत ठीक नसल्याने ते एकटेच मंदिरात जाण्यासाठी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. मात्र, रात्र झाली तरीही रत्नाकर बोरे घरी परतले नाही. याचवेळी मोठा मुलगा प्रसाद कामावरून घरी आला. त्याने वडिलांचा मंदिरात शोध घेतला असता वडील मंदिरात आलेच नसल्याचे कळले. लहान मुलगा प्रमोद यास माहिती मिळताच तो देखील वडिलांच्या शोधार्थ शहरात माहिती घेऊ लागला. रात्रभर नातेवाईक, मित्रांच्या सहाय्याने शोध घेऊन देखील रत्नाकर बोरे सापडले नाही. सोशल मीडियातून आवाहन केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, आळंदी, पंढरपूर, शिर्डी येथे ते दिसल्याची माहिती मिळाली. याच्या आधारे बोरे भावडांनी दुचाकीवरून तिकडे धाव घेऊन शोध घेतला. मात्र, काही तासांच्या फरकाने ते तेथून दुसरीकडे गेल्याची माहिती मिळत गेली. पोलिसांची, सोशल मीडियाची मदत घेऊनही आजवर रत्नाकर बोरे यांचा शोध लागला नाही.

चार दिवस शोध, तीन दिवस काम प्रसाद आणि प्रमोद हे दोघे खाजगी कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी आहेत. दोघेही वडिलांच्या शोधार्थ प्रत्येक आठवड्यात काही गावे ठरवून बाहेर पडतात. पण प्रवास आणि घर खर्च देखील सांभाळावा लागतो. हे जाणून दोघेही चार दिवस वडिलांचा शोध घेतात तर तीन दिवस काम करतात. यात नातेवाईक, विविध संस्था, मित्र परिवारांचा खंबीर साथ लाभत असल्याचे दोघेही सांगतात. 

४ हजार किमीचा केला प्रवास रत्नाकर बोरे हे गायब झाले त्या दिवशी बीड बसस्थानकावर दिसून आले होते. त्यानंतर ते औरंगाबाद बसस्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. यावरून बोरे बंधूंनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे, आळंदी, श्रीरामपूर, शिर्डी, पंढरपूर, परभणी, नांदेड, तुळजापूर, नाशिक, मनमाड,  अक्कलकोट आदी शहरात तब्बल ४ हजार किमीचा प्रवास करून दोघांनी वडिलांचा शोध घेतला आहे. रत्नाकर बोरे तीर्थस्थळी जास्त दिसून येत आहेत. त्यांची माहिती 8014136136, 9975767808 या क्रमांकांवर देण्याचे आवाहन बोरे बंधूनी केले आहे. 

इतर तिघांची त्यांच्या घरच्यांना सापडून दिलेवडिलांच्या शोध मोहिमेत निघालेल्या बोरे बंधूंनी घरापासून दुरावलेल्या तिघांची नातेवाईकांसोबत भेट घडवून दिली आहे. माजलगाव, तालखेड आणि काळेवाडी येथील एक तरुण, एक वृद्ध तर एका तरुणी आता नातेवाईकांसोबत घरी राहत आहेत.  

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक